मुंबई  - Stomach Infection पावसाळ्यात अनेकांना पोटदुखीचा त्रास होतो. या पोटदुखीचं कारण अनेक वेळा इन्फेक्शनही असू शकतं. पावसाळ्यात पाणी आणि बाहेरील अन्नपदार्थांच्या सेवनामुळे पोटात इन्फेक्शन (Infection) होतं. पोटात झालेल्या इन्फेक्शनला डॉक्टर पोटातील फ्लू असं म्हणतात. पोटात (Stomach) गंभीर स्वरुपात वेदना आणि इतर लक्षणं दिसत असतील, तर या गोष्टींकडे दुर्लक्ष करु नका. ही पोटदुखी एखाद्या गंभीर आजाराचे संकेत पण असू शकतं. अशावेळी डॉक्टरांचा सल्ला घेणं कधीही योग्य. पोटात इन्फेक्शन झालं असेल तर कुठली लक्षणं (Symptoms)दिसतात ते जाणून घेऊयात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उलट्या


पोटासंबंधी कोणताही आजार असल्यास आपल्याला सर्वप्रथम पोटदुखी जाणवते, अन्नपदार्थ पचत नाही, उलट्या होतात. वारंवार उलट्या झाल्यास या लक्षणांकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. उलट्या झाल्यामुळे शरीरात पाण्याचं प्रमाण कमी होतं. त्यामुळे आपल्याला अशक्तपणा येतो. 


अतिसार (डायरिया)
पोटात इन्फेक्शन झालं असेल तर अतिसाराचा त्रास होतो. खाण्यापिण्यात काही कमी जास्त झालं असेल असं समजून अनेकजण या लक्षणांकडे कानाडोळा करतात. अतिसार किंवा जुलाब हे पोटात इन्फेक्शन झाल्यामुळेही होतं. अशावेळी ताबडतोडब डॉक्टरांचा सल्ला घ्या. 



पोटदुखी 
पोटात इन्फेक्शन झालं असेल तर सर्वप्रथम आपल्या पोटात दुखू लागतं. अनेक वेळा काही अंतराने कळाही जाणवतात. काही वेळा या कळ्या असह्य असतात. जेवणात पचनास जड पदार्थ खाल्ल्यामुळे पोटदुखी झाली असेल असं अनेकांना वाटतं. पण ही पोटदुखी पोटात झालेल्या इन्फेक्शनमुळे असू शकते. 


स्नायूमध्ये दुखणं
आपण अनेक वेळा ऐकतो, माझी पाठ दुखतेय, कंबर किंवा पाय दुखत आहेत. दिवसभरात कामाचा ताण आल्यामुळे आपली पाठ, कंबर किंवा पाय दुखतोय असं आपण समजतो. मात्र ही लक्षणंही पोटाच्या आजाराची असू शकतात. पोटात इन्फेक्शन झालं असेल तर पाठ, कंबर आणि पाय दुखीचा त्रास होतो. या दुखण्यावर गरम पाण्याचा शेक घेतल्यास काही वेळासाठी बरं वाटतं. पोटात इन्फेक्शन झाल्यास अशी लक्षणं दिसतात. या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास आपण्यास महागात पडू शकतं. त्यामुळे वेळीच सावध व्हा आणि अशी लक्षणं दिसल्यास डॉक्टरांकडे जा.