दिल्ली : भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन ही लस अजूनही वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या मंजूरीच्या प्रतिक्षेत आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, लसीच्या वापरास परवानगी देण्याच्या निर्णयासाठी लसीचं संपूर्ण मूल्यांकन आणि शिफारस करण्याची प्रक्रिया कधीकधी जास्त वेळ घेते. मात्र यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे याद्वारे जगाला योग्य तो सल्ला मिळयला पाहिजे. भले त्यासाठी अधिक वेळा लागला.


डॉ माइक रायन यांचं उत्तर


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

26 ऑक्टोबरपर्यंत लसींच्या इमरजेंसी वापराच्या सूचीमध्ये कोव्हॅक्सिनचा समालेश केल्यास निश्चित उत्तर मिळेल का असं डब्ल्यूएचओच्या आरोग्य हेल्थ इमरजेंसी प्रोग्रामचे कार्यकारी संचालक डॉ.माईक रायन यांना विचारण्यात आलं होतं. यावेळी त्यांनी सांगितलं की, भारतात उत्पादित कोव्हॅक्सिन, कोविड -19 विरोधी, आपात्कालीन वापरासाठी लसींच्या यादीमध्ये समाविष्ट करण्याचा निर्णय प्रलंबित आहे.


26 ऑक्टोबर रोजी होणार बैठक


डब्ल्यूएचओच्या मुख्य शास्त्रज्ञ सौम्या स्वामीनाथन यांनी एका ट्विटमध्ये म्हटलंय की, भारत बायोटेकने निर्मित केलेली कोव्हॅक्सिन ही अँटी-कोविड-19 लस आपात्कालीन वापरासाठी लसींच्या यादीत ठेवण्याचा विचार करण्यासाठी WHO मधील तांत्रिक सल्लागार गट 26 ऑक्टोबर रोजी बैठक घेणार आहेत. 


ग्लोबल हेल्थ ऑर्गनायझेशनने एका ट्विटमध्ये असंही म्हटलं आहे की, भारत बायोटेक कडून कोव्हॅक्सिन या लसीसंदर्भात अतिरिक्त माहिती प्राप्त करण्यास उत्सुक आहे.


WHOच्या ट्विटमध्ये असंही नमूद करण्यात आलंय की, "आम्हाला माहित आहे की, कोविड-19 विरुद्धच्या आपत्कालीन लसींच्या यादीत कोव्हॅक्सिनचा समावेश करण्यासाठी बरेच लोक WHOच्या शिफारसीची वाट पाहत आहेत. पण आम्ही हे काम घाईत करू शकत नाही."