तूर, उडीद की मूग... कोणत्या डाळीत असते सर्वाधीक प्रोटीन, रोजच्या आहारात कोणती डाळ वापरावी?
Health News In Marathi: डाळीत अनेक पौष्टिक गुण असतात. पण आरोग्यासाठी कोणती डाळ उत्तम हे जाणून घेऊया.
डाळ हा भारतीय जेवणातील महत्त्वपूर्ण भाग आहे. डाळींमध्ये पोषणदेखील मुबलक प्रमाणात असते. वरण-भात हा आपला रोजचा आहार आहे. डाळीत प्रोटीन असते. घरात दररोज वेगवेगळ्या डाळींचे वरण केले जाते. तूर, उडीद आणि मूग डाळ या डाळींपैकी कोणत्या डाळींमध्ये जास्त प्रोटीन असते, हे आज आपण जाणून घेऊया.
प्रोटीन आपल्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. खासकरुन मांसपेशिया आणि शरीराला पोषण मिळावं यासाठी डाळ उत्तम स्त्रोत मानला जातो. पण कोणती डाळ तुम्हाला जास्त प्रोटीन देऊ शकते हे जाणून घेऊया. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, डाळींचे सेवन करण्याअगोदर त्यांच्या पोषणमुल्यावरही लक्ष देणे गरजेचे आहे. जेणेकरुन तुमच्या आहारात प्रोटीनची गरज भरुन काढू शकाल. जाणून घेऊया तूर, उडीद आणि मूग डाळ यापैकी कोणत्या डाळीत प्रोटीन जास्त असते.
उडदाची डाळः उडदाची डाळ पौष्टिक डाळींपैकी एक मानली जाते. यात प्रोटीनची मात्रा चांगली असते. 100 ग्रॅम उडदाच्या डाळीत जवळपास 25 ग्रॅम प्रोटीन असते. शरीरातील मांसपेशी मजबूत करण्यासाठी फायदेशीर आहे. त्यातबरोबर फायबर आणि आयर्नची मात्रा चांगली असते. जे पाचनतंत्र आणि रक्ताची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत करते.
मुगाची डाळः मुगाची डाळ पचायला हलकी असते. ही डाळ या लोकांसाठी फायदेशीर असते ज्यांना प्रोटीनची आवश्यकते असते. व पचनतंत्र मजबूत नसते. 100 ग्रॅम हिरव्या मूग डाळीत जवळपास 24 ग्रॅम प्रोटीन असते. जे शरीराला एनर्जी देते जे मांसपेशींना बळकटी देते. ही डाळ अँटी ऑक्सीडेंट्सने भरपूर असते. जी रोगप्रतिकारशक्ती वाढवते.
तूरीची डाळः तुरीच्या डाळीत प्रोटीन भरपूर प्रमाणात असते. भारतीय घरांमध्ये सर्वात जास्त ही डाळ वापरली जाते. 100 ग्रॅम तुरीच्या डाळीत जवळपास 22 ग्रॅम प्रोटीन असते. त्याचबरोबर यात फायबर आणि पोटॅशियमची मात्रा अधिक असते. जे हृदयाचे आरोग्य निरोगी राखते.
तज्ज्ञ काय म्हणतात?
आहारतज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, उडदाच्या डाळीत सर्वाधीक प्रोटीन असते. मूग आणि तूरीच्या डाळीत प्रोटीनचा चांगला सोर्स असतो. जर तुम्ही जेवणात डाळींचा समावेश केला तर तर प्रोटीनची कमतरता पूर्ण करते.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)