मुंबई : व्यायामासाठी योग्य वेळ पाळणं फार महत्वाचे आहे. जर तुम्हाला तुमच्या व्यायामाचा योग्य परिणाम हवा असेल तर तुम्ही नियमांनुसार वेळेची मर्यादा पाळली पाहिजे. आज आपण जाणून घेऊया व्यायाम करण्यासाठी कोणती वेळ उत्तम ठरू शकते. जेणेकरून तुम्ही तुमचं व्यायामाचं वेळापत्रक निश्चित करू शकता आणि तुम्हाला व्यायामाचा चांगला परिणाम दिसून येईल.


सकाळी एक्सरसाईज करणं


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोणत्याही शारीरिक हालचालीसाठी जसं की व्यायामासाठी सकाळची वेळ सर्वात महत्त्वाची मानली जाते. सकाळी एक ग्लास कोमट पाणी प्यायल्यानंतर तुम्ही तुमचा व्यायाम सुरू करू शकता. तुम्हाला दुप्पट वेगाने प्रभाव दिसेल.


संध्याकाळीही करू शकता एक्सरसाईज


जर तुमच्याकडे सकाळची वेळ नसेल, तर तुम्ही संध्याकाळी तुमची व्यायाम करू शकता. यासाठी व्यायाम करण्यापूर्वी 2 तास उपाशी राहणं आवश्यक आहे. जेवल्यानंतर लगेच व्यायाम करू नका.


झोपायला जाताना काही इफेक्टिव्ह वर्कआऊट


तुम्हाला तुमच्या शरीरातील एखाद्या विशिष्ट ठिकाणची चरबी कमी करायची असेल, तर तुम्ही झोपण्यापूर्वी त्या जागेसाठी व्यायामाचा नियम पाळू शकता. त्यामुळे तिथल्या स्नायूंवर परिणाम होईल. ज्याचा 2 पट वेगाने तुम्हाला रिझल्ट मिळण्याची शक्यता आहे.