मुंबई : Booster Dose  : केंद्र सरकारने 10 एप्रिलपासून 18 वर्षांवरील लोकांसाठी कोरोना लसीचा (Corona Vaccine)  बूस्टर डोस (Booster Dose) मंजूर केला आहे. 18 वर्षांवरील कोणीही तिसरा डोस घेऊ शकतो. आतापर्यंत, आरोग्यसेवा आणि फ्रंटलाइन कामगारांसह 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना बूस्टर डोस दिला जात होता. बूस्टरच्या डोसबाबत लोकांच्या मनात अनेक प्रकारचे प्रश्न आहेत. लोकांना कोणता बूस्टर डोस दिला जाईल, त्याची किंमत किती असेल? ते सविस्तर समजून घ्या.


बूस्टर डोस म्हणजे काय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सामान्य लस व्यतिरिक्त, बूस्टर डोस विशिष्ट जंतू किंवा विषाणूविरूद्ध लढण्यासाठी शरीराची प्रतिकारशक्ती वाढवते आणि मजबूत करते. हा बूस्टर डोस व्यक्तीने आधी घेतलेल्या लसीचा असू शकतो. शरीरात अधिक अॅन्टीबॉडीज तयार करून रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी याचा वापर केला जातो. सोप्या भाषेत सांगायचे तर, बूस्टर डोस शरीराच्या प्रतिकारशक्तीची आठवण करून देतो की एखाद्या विशिष्ट विषाणूविरूद्ध लढण्यासाठी तयार असणे आवश्यक आहे.


बूस्टर डोस कोणाला मिळेल?


18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या कोणत्याही व्यक्तीला बूस्टर डोस मिळू शकतो. ज्यांच्या दुसऱ्या डोसनंतर 9 महिने (39 आठवडे) पूर्ण झाले आहेत. बूस्टर डोसमध्ये मिक्स अण्ड मॅच होणार नसल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. ज्या लोकांनी लसीचा पहिला आणि दुसरा डोस घेतला आहे त्यांना त्याच लसीचा बूस्टर डोस दिला जाईल.


कुठे नोंदणी करायची


लसीच्या बूस्टर डोससाठी लोक https://selfregistration.cowin.gov.in/ वर लॉग इन करू शकतात. याशिवाय आरोग्य सेतू अॅपवरही नोंदणी करता येईल. एकदा तुम्ही अॅपमध्ये साइन इन केल्यानंतर, तुम्हाला CoWin मुख्यपृष्ठावर ओळखीचा पुरावा अपडेट करावा लागेल.


कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत


ओळखीच्या पुराव्यासाठी तुम्ही आधार कार्ड वापरू शकता. याशिवाय, आरोग्य मंत्रालयाने मंजूर केलेले इतर आयडी जसे की EPIC, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, NPR अंतर्गत RGI द्वारे जारी केलेले स्मार्ट कार्ड, फोटोसह पेन्शन दस्तऐवज देखील वापरता येतील.


किंमत काय असेल?


सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या (SII) कोविशील्ड  (Covishield) लसीचा बूस्टर डोस 600 रुपयांपेक्षा जास्त किमतीत उपलब्ध असेल. दुसरीकडे, तुम्हाला लसीसाठी 1200 रुपये द्यावे लागतील.