Which Bread is good for your health : ब्रेड हा प्रकार आपण लहाणपणापासून खातो. ब्रेड हा तेव्हा पासून आपल्या आहाराचा एक भाग झाला आहे. कधी ब्रेड-बटर, कधी जॅम-ब्रेड तर कधी सॅन्डविच. आपल्या आहारात कोणत्या ना कोणत्या प्रकारे ब्रेड राहतोच. इतकंच नाही तर आजकाल भाजी-ब्रेड खाण्यास अनेक लोक पसंती देतात. त्यामुळे आता बाजारात आपल्याला ब्रेडचे वेगवेगळे प्रकार पाहायला मिळतात. त्यात मुख्यता मल्टीग्रेन ब्रेड, होल व्हीट ब्रेड आणि व्हाईट ब्रेड सर्वात सामान्य आहेत. आता याविषयीही अनेकांना कल्पना नाही, चला तर जाणून घेऊया कोणत्या ब्रेडचे कोणते फायदे आहेत. कोणता ब्रेड तुमच्या आरोग्यासाठी चांगला ठरत आहे. 


या तीन प्रकारच्या ब्रेडमध्ये काय फरक आहे?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हाईट ब्रेड
भारतातील बहुतेक लोक हे व्हाईट ब्रेडचे सेवन करतात. त्यात हे ब्रेड सहज आपल्याला बाजारात उपलब्ध होतात. व्हाईट ब्रेड हे रिफाइंड फ्लार पासून म्हणजेच मैद्यापासून बनवण्यात येतात. तर मैदा हा आपल्या आरोग्यासाठी चांगला नाही. डायबिटीज असलेल्या लोकांनी मैदा खाणे टाळायला हवे. व्हाईट ब्रेडमध्ये कॅल्शियम मोठ्या प्रमाणात असले तरी देखील त्यात फायबरचे प्रमाणे हे खूपच कमी असते. जेव्हा व्हाईट ब्रेड बनवण्यात येतो तेव्हा त्यातून फायबर काढून टाकण्यात येते. त्यामुळेच व्हाईट ब्रेड पचवणं कठीण होतं. व्हाईट ब्रेडच्या एका स्लाईसमध्ये 1 ग्रॅम फॅट आणि 67 कॅलरीज असतात, त्यामुळे हे खाल्ल्याने लठ्ठपणाही वाढू शकतो.


होलव्हीट ब्रेड
सगळ्यांना या ब्रेडविषयी माहिती आहे. यात गव्हाचे पीठ वापरण्यात येते. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर गव्हाच्या पिठात असलेला कोंडा हा ब्रेड बनवताना काढला जात नाही. त्यामुळे यात फायबरचे प्रमाण जास्त असते. यामुळे पचनक्रिया देखील नीट होते. यात जीवनसत्त्वे आणि खनिजे वेगळे मिसळण्याची गरज नाही, कारण त्यात खनिजे नैसर्गिकरित्या या सगळ्या गोष्टी मोठ्या प्रमाणात आढळतात. पौष्टिक असण्यासोबतच ते चविष्ट देखील आहे.


हेही वाचा : कमी पाणी प्यायल्यानं होऊ शकतात गंभीर समस्या! 'या' गोष्टींची घ्या काळजी


मल्टीग्रेन ब्रेड


मल्टीग्रेन ब्रेडबद्दल अनेकांनी ऐकलं आहे. तुम्हाला या ब्रेडच्या नावावरून अनेक गोष्टी स्पष्ट होतात आणि त्या म्हणजे सगळी धान्य एकत्र करून त्यापासून हा ब्रेड बनवण्यात येतो. त्यात सगळी धान्य ही आपल्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाची ठरतात अशात जर ही सगळी धान्य आपल्याला ब्रेडमध्ये मिळत असतील तर त्यातून आपल्याला नक्कीच कोणतेही होण्याची शक्यता नाही. त्यामुळे जर तुम्हाला ब्रेड खाण्याची सवय असेल तर अशा परिस्थितीत मल्टीग्रेन ब्रेड हा एक चांगला पर्याय आहे. इतर प्रकारच्या ब्रेडच्या तुलनेत, मल्टीग्रेन ब्रेडचा ग्लायसेमिक इंडेक्स देखील कमी आहे. त्यामुळे व्हाईट ब्रेड आणि होल व्हीट ब्रेडपेक्षा मल्टीग्रेन ब्रेड हा चांगला पर्याय आहे. 


( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )