मुंबई : पावसाळा आणि आजारपण हे जोडीने येतं. ताप, सर्दी, खोकला, इन्फेकशन याबरोबरच पावसाळ्यात येणारा अजून एक आजार म्हणजे लेप्टोस्पायरोसिस. परंतु, अनेक लोकांना याबद्दल माहीती नाही. या आजाराचा पसार कुत्रा, उंदीर यांसारख्या प्राण्यांमुळे होतो. खूप पाऊस पडल्यावर पाणी साचतं. काही वेळा पूर येतो. अशा साचलेल्या पाण्यात प्राण्यांच्या  लघवीतील बॅक्टरीया मिसळतात व त्यामुळे इन्फेकशन पसरते. तर जाणून घेऊया लेप्टोस्पायरोसिसचा धोका कोणाला अधिक आहे ? 
परंतु, काही ठराविक गोष्टींमुळे इन्फेकशनचा धोका अधिक वाढतो.  लेप्टोस्पायरोसिसचा धोका वाढवणाऱ्या घटकांविषयी माहिती करुन घेऊया. त्याचबरोबर त्या आजाराला आळा घालण्याचे मार्गही जाणून घेऊया....


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

# सगळ्यांनाच लेप्टोस्पायरोसिसचा धोका आहे. परंतु, जर तुम्ही रहात असलेल्या ठिकाणी आजूबाजूला उंदीरांचा प्रादुर्भाव असेल तर हा धोका अधिक वाढतो. कारण त्यामुळे पाणी, माती, अन्न प्राण्यांच्या लघवीमुळे दूषित होऊन इन्फेकशन पसरण्याची शक्यता असते.


# या बॅक्टरीयांचा त्वचेत शिरकाव झाल्यानंतर त्वचा फाटली गेल्यास, स्क्रॅचेस आल्यास धोका अधिक वाढतो.  Leptospira बॅक्टरीयामुळे दूषित झालेल्या पाण्यामुळे लेप्टोस्पायरोसिस होतो. परंतु, एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे हा आजार पसरण्याची शक्यता तशी कमीच असते.


# पावसाळ्यात शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांना लेप्टोस्पायरोसिसचा धोका वाढतो. पशुवैद्य, प्राण्यांचे केयर टेकर यांना देखील हा धोका असतो. जर तुम्ही आऊटडोअर स्पोर्ट्स म्हणजेच राफ्टिंग, स्विमिन्ग दूषित पाण्यात करत असाल तर तुम्हाला इन्फेकशन होण्याची शक्यता असते. 


लेप्टोस्पायरोसिसला आळा कसा घालावा ?


  • पाणी साठलेल्या जागेतून चालणे टाळा. चिखल, घाण असलेल्या जागी अधिक काळ राहू नका. बरं वाटत नसल्यास किंवा लेप्टोस्पायरोसिसची लक्षणे दिसून आल्यास लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या. 

  • स्वतःहून उपचार करण्यापेक्षा डॉक्टरांनाकडे जाणे योग्य ठरेल. कारण स्वतःहून औषधे केल्यास त्रास वाढून परिस्थिती गंभीर होऊ शकते. घर, आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा. फिरायला गेलेल्या ठिकाणी देखील स्वच्छता राखा. मुंंबईत लेप्टोचा पहिला बळी, या साथीच्या आजारापासून बचावण्यासाठी खास टीप्स