मुंबई : कोरोना विषाणूचा संसर्ग पुन्हा एकदा जगासाठी चिंतेचा विषय बनला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) इशारा दिला आहे की, 53 देशांमध्ये कोरोनाची नवीन लाट येऊ शकते. डब्ल्यूएचओच्या प्रादेशिक कार्यालयाचे प्रमुख डॉ. हंस क्लेझ यांनी गुरुवारी सांगितलं की, काही देशांमध्ये रुग्णांची संख्या पुन्हा जवळच्या विक्रमी पातळीवर वाढू लागली. आणि प्रसाराचा वेग ही गंभीर चिंतेची बाब आहे. अशा परिस्थितीत कोरोनाची नवी लाट येण्याची शक्यता नाकारता येत नाही.


कोरोनामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डब्ल्यूएचओच्या अधिकाऱ्याच्या म्हणण्याप्रमाणे, असंच सुरु राहिल्यास फेब्रुवारीपर्यंत आणखी पाच लाख लोकांचा या साथीमुळे मृत्यू होऊ शकतो. युरोप आणि मध्य आशियातील 53 देशांमध्ये कोरोना विषाणूची आणखी एक लाट येण्याचा धोका आहे. 


डॉ. हंस क्लेज यांनी डेन्मार्कमधील कोपनहेगन इथल्या संघटनेच्या युरोप मुख्यालयात पत्रकारांना सांगितले की, "आम्ही महामारीच्या उद्रेकाच्या एका गंभीर टप्प्यावर उभे आहोत. युरोप पुन्हा एकदा महामारीच्या केंद्रस्थानी आहे जिथे आपण एक वर्षापूर्वी होतो."


डॉ. क्लेज म्हणाले की, भूतकाळातील आणि सध्याच्या परिस्थितीत फरक एवढाच आहे की आरोग्य अधिकाऱ्यांना व्हायरसबद्दल अधिक माहिती आहे. त्यांच्याकडे कोरोनाशी लढण्यासाठी चांगली उपकरणं आहेत. विषाणूचा प्रसार रोखण्यासाठीचे उपाय आणि काही भागात लसीकरणाचे कमी दरामुळे प्रकरणं वाढत होत असल्याचं स्पष्ट आहे. गेल्या एका आठवड्यात कोविडमुळे 53 देशांमध्ये रूग्णालयात दाखल होण्याचं प्रमाण दुप्पट झालं आहे.


डब्ल्यूएचओने म्हटलं आहे की, हीच स्थिती राहिल्यास फेब्रुवारीपर्यंत या महामारीमुळे आणखी पाच लाख लोकांचा मृत्यू होऊ शकतो. 53 देशांच्या मोठ्या भागात, साप्ताहिक प्रकरणं सुमारे 1.8 दशलक्ष झाली आहेत. जी गेल्या आठवड्यापेक्षा सहा टक्क्यांनी जास्त आहे. दर आठवड्याला 24,000 मृत्यू होतात, जे प्रमाण 12 टक्क्यांनी वाढलं आहे. लोक पुन्हा एकदा कोरोना महामारीबाबत बेफिकीर आहेत. कोणालाही इथे मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग पाळायचं नाहीये.