Health tips : घड्याळाच्या काट्यावर आयुष्य जगणाऱ्या सध्याच्या पिठीसाठी काही महत्त्वाच्या गोष्टी प्राधान्यस्थानी आल्या आहेत आणि त्यात गैर काहीच नाही. सध्याच्या घडीला नोकरी, घर यासोबतच आरोग्यविषयक मुद्द्यांनाही केंद्रस्थानी ठेवलं जात आहे. जीवनशैलीचा (lifestyle) तोल ढासळल्यामुळे बसणारा फटका सोसण्यापेक्षा आधीच काही गोष्टींमध्ये बदल करून आनंदी आयुष्य जगण्याकडे अनेकांचाच कल दिसत आहे. हे वाचून आम्हीही यातलेच... असाच सूर तुम्ही आळवू शकता. (whole wheat roti or bajra roti which is healthier know benefits)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

निरोगी जीवनशैलीची सुरुवात ही एका सकारात्मक विचारापासून आणि स्वत:पासून होते. काही सवयींमध्ये बदल करत तुम्हीही हे साध्य करू शकता. याची सुरुवात अनेकजण करत आहेत ती म्हणजे त्यांच्या आहारांच्या सवयीपासून. 


अधिक वाचा : शरीराला उर्जा, स्फुर्ती देणारा हिवाळ्यातील योग्य आहार


भारतामध्ये चपाती (Chapati), रोटी खाण्याला पसंती दिली जाते. सकाळच्या न्याहारीपासून (breakfast) दुपारचं जेवण (Lunch), रात्रीचं जेवण (Dinner) या साऱ्यामध्ये चपाती अनेकदा असतेच. गव्हाचं पीठ (Wheat Flour) मऊसूत मळून त्याची पोळी लाटून ती देशातील बहुतांश भागांमध्ये खाल्ली जाते. पण, आरोग्याला पूरक असणाऱ्या गोष्टी निवडत असताना आता अनेकांनीच आपला मोर्चा गव्हाच्या पीठापासून, ज्वारी- बाजरी (Jowar bajra), नाचणी (Ragi) आणि तत्सम पिठांकडे वळवला आहे. बाजरीच्या पिठाचे शरीराला होणारे फायदे पाहता, तुलनेनं त्याला जास्त पसंती मिळताना दिसत आहे. थोडक्यात येत्या काही दिवसांत गहू हद्दपार होणार का? हाच प्रश्न विचारला जात आहे. 


प्रोटीन्सचा (Proteins) साठा- एक कप बाजरीच्या पिठात 4 भाकऱ्या बनवता येतात. प्रत्येक भाकरीमध्ये 1.8 ग्रॅम प्रोटीन असतात. ज्याचा फायदा स्नायू बळकट करण्यासोबतच शरीरातील रक्तवाहिन्यांनाही होतो. 


फायबर (Fiber) (तंतू)- हा एक असा घटक आहे, ज्याचा फायदा तुमच्या पचन क्रियेसाठी होतो. पोट स्वच्छ ठेवण्यापासून शरीराची उत्सर्जन प्रक्रिया सुरळीत सुरु ठेवण्यासाठी या घटकाची मदत होते. 


ग्लुटन विरहीत बाजरी (Gluten) - ज्यांनी शरीरासाठी ग्लुटन फ्री होण्याचा अर्थात ग्लुटन नसणारे पदार्थ खाण्याचा मार्ग निवडला आहे त्यांच्यासाठी बाजरी सर्वोत्तम पर्याय.  


अधिक वाचा : Diwali 2022 : या दिवाळीत फराळाच्या अतिसेवनाने होऊ शकते पोटदुखी..करा हे घरगुती उपाय


मधुमेह (diabetics) असणाऱ्यांसाठी चांगला पर्याय- बाजरीमध्ये मॅग्नेशियमचं प्रमाण अधिक असल्यामुळं मधुमेह असणाऱ्यांना या पिठापासून तयार करण्यात आलेल्या भाकरीनं काहीच हानी पोहोचत नाही. बाजरीमुळं रक्तातील साखरेचं प्रमाणंही नियंत्रणात राहतं. 


कोलेस्ट्रॉल (Cholesterol) नियंत्रणात मदत- बाजरीमध्ये तंतूमय घटक जास्त असल्यामुळे याचा फायदा शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी होतो. यामुळं रक्तदाबही नियंत्रणात राहतो. 


अॅसिडीटीसाठी (Acidity) रामबाण उपाय- अॅसिडीटी अर्थाच अपचनाचा त्रास असणाऱ्यांनी आवर्जून बाजरीच्याच भाकऱ्या खाव्यात. यामुळं त्यांच्या अपचनाच्या तक्रारी दूर होतील. बाजरीची खिचडी हासुद्धा एक उत्तम पर्याय असू शकतो.