Diwali 2022 : या दिवाळीत फराळाच्या अतिसेवनाने होऊ शकते पोटदुखी..करा हे घरगुती उपाय

दिवाळी सण अवघ्या काही  ठेवपलाय, सगळीकडे लगबग सुरु आहे शॉपिंगची घरोघरी फराळ बनवायला सुरवात झाली असेल, एव्हाना काही घरांमध्ये फराळ  बनवून झालासुद्धा असेल, दिवाळी सणात आपल्या घरी अनेक प्रकारचे फराळ बनतात.

Updated: Oct 17, 2022, 06:23 PM IST
Diwali 2022 : या दिवाळीत फराळाच्या अतिसेवनाने होऊ शकते पोटदुखी..करा हे घरगुती उपाय  title=

Healthy eating tips for diwali 2022 : दिवाळी सण अवघ्या काही  ठेवपलाय, सगळीकडे लगबग सुरु आहे शॉपिंगची घरोघरी फराळ बनवायला सुरवात झाली असेल, एव्हाना काही घरांमध्ये फराळ  बनवून झालासुद्धा असेल, दिवाळी सणात आपल्या घरी अनेक प्रकारचे फराळ बनतात.

आणि आपण सर्वच त्यावर ताव मारतो अगदी  दिवाळी संपेपर्यंत  करून टाकतो . फराळात बनवलेल्या पदार्थांमध्ये बेसन,मैदा,जे पचनासाठी जड असतात शिवाय चिवडा करंजी हे तळलेले पदार्थ जसे कि शंकरपाळी, कारंजी,चिवडा  सगळं तेलकट असत आणि त्यामुळे पोट बिघडू (diwali faral) शकत आणि अशा वेळी घरच्या घरी काही उपाय करून तुम्ही आराम मिळवू शकता . 

आणखी वाचा: दिवाळीच्या आधी अशी करा देवघराची साफसफाई..देवांच्या मूर्ती मिनिटात चमकतील..

चला तर मग जाणून घेऊया या दिवाळीत फराळ जास्त खाल्ला आणि पोट बिघडलच तर काय उपाय करावे. (home remedies for stomoch upset this diwali)
दिवाळीच्या सणात सतत खाल्ल्यामुळे अॅसिडीटी, गॅस, अपचन  (acidity, gases, indigestion) यासारख्या समस्या असतील तर तुम्ही ओव्याची मदत घेऊ शकता. यासाठी तुम्ही एक छोटा चमचा ओवा घ्या त्याची बारीक पावडर करा आणि त्यात चिमूटभर काळे किंवा खडे मीठ मिसळा आणि जेवल्यानंतर दहा मिनिटांनी पाण्यासोबत खा.

आणखी वाचा:  या दिवाळीत अशी करा स्वच्छता..सोप्या घरगुती उपायांनी चमकवा वस्तू 

सुंठ 
सुंठ पावडर देखील तुमची गॅस आणि अॅसिडिटीची समस्या कमी करण्यास मदत करते. यासाठी जेवणानंतर दहा-पंधरा मिनिटांनी सुंठ पावडर अर्धा चमचा पाण्यासोबत घ्या.

हिरडा 

पोट साफ करण्यासाठी तुम्ही हिरड्याचा वापर करू शकता. यामुळे बद्धकोष्ठता आणि अपचनसारख्या समस्या दूर होतील. यासाठी हिरडा बारीक करून पावडर बनवावी, त्यानंतर जेवण झाल्यावर दहा ते पंधरा मिनिटांनी अर्धा चमचा  पावडर साध्या पाण्यासोबत घ्यावी.

आणखी वाचा: diwali 2022: यंदाच्या दिवाळीत राशीनुसार करा खरेदी..देवी लक्ष्मीची होईल कृपा..होईल भरभराट

हिंग

हिंगाचे खूप फायदे आहेत . जर फराळ जास्त खाल्ल्यामुळे अपचन किंवा बद्धकोष्टता जाणवत असेल तर चिमूटभर हिंग घेऊन पाण्यात मिसळून ते पाणी प्यावे पाणी कोमट असावे. जर पोट जास्तच खराब झालं असेल तर हिंग पावडर थोडी भाजून मग पाण्यासोबत खावी. 
हे काही घरगुती उपाय आहेत ज्याने या दिवाळीत तुमच्यावर पॉट धरून बसण्याची वेळ येणार नाही. 

(वरील माहिती सामान्य माहितीच्या आधारे दिलेली आहे.झी २४ तास याची खातरजमा करत नाही)