मुंबई : सध्या ओमायक्रॉनचा धोका समोर असताना फ्रान्समध्ये कोरोनाचा नवा व्हेरिएंट समोर आला आहे. IHU नावाच्या या व्हेरिएंटने फ्रान्समध्ये 12 जणांचा विखळण्यात ओढलंय. तर आता यावर जागतिक आरोग्य संस्थेने त्यांचं मत मांडलं आहे. WHOने फ्रान्समध्ये सापडलेला हा व्हेरिएंट जास्त धोकादायक नसल्याचं म्हटलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

WHO अधिकारी अब्दी महमूद यांनी मंगळवारी जिनिव्हा इथल्या पत्रकार परिषदेत सांगितलं की, ''हा नवीन व्हेरिएंट आमच्या रडारवर आहे. फ्रान्समध्ये, गेल्या वर्षी दक्षिण आफ्रिकेत ओमायक्रॉन व्हेरिएंट आढळला. त्याच वेळी 12 लोकांना या नव्या प्रकाराची लागण झाल्याचं समजलं आहे."


संशोधक डिडायर राऊल्ट यांच्या नेतृत्वाखालील 'द मेडिटेरेनियन इन्फेक्शन युनिव्हर्सिटी हॉस्पिटल इन्स्टिट्यूट'च्या संशोधकांनी नवीन IHU किंवा B.1.640.2 व्हेरिएंट शोधला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, या नव्या व्हेरिएंटची लागण झालेल्या पहिला व्यक्ती वॅक्सिनेटेड होता. हा व्यक्ती कॅमेरूनमधून फ्रान्समध्ये परतला होता. डिसेंबरच्या अखेरीस medRxiv सर्वरवर प्रसिद्ध झालेल्या रिसर्च पेपरमध्ये IHU च्या संशोधकांनी याचं असामान्य म्युटेशनवर लक्ष वेधलं होतं. 


IHU व्हेरियंटच्या केवळ 12 रूग्णांच्या आधारे वायरोलॉजिकल, एपिडेमायोलॉजिकल आणि क्लीनिकल फीचरबाबत काहीही अंदाज लावणं घाईचं ठरेल, असं या पेपरच्या रिव्ह्यू आर्टिकलमध्ये लिहिण्यात आलं होतं.


संसर्गाचा अहवाल येण्याच्या एक दिवस अगोदर रुग्णांना श्वसनासंबंधी लक्षणं जाणवत असल्याची तक्रार पहायला मिळाली. दरम्यान कोरोनाचा नवा व्हेरिएंट फ्रान्सच्या बाहेर गेल्याचे ठोस पुरावे नाहीत.