मुंबई : कोरोनाच्या रूग्णसंख्येत पुन्हा एकदा वाढ होताना दिसतेय. दिल्लीत कोरोनाच्या रुग्णांमध्ये अचानक वाढ झाल्याने सरकारची चिंता वाढली आहे. परिस्थिती पुन्हा बिघडू नये हे लक्षात घेता सरकार नागरिकांना कोरोना प्रोटोकॉलचं सतत पालन करण्यासोबतच वैद्यकीय सुविधा बळकट करण्याचं आवाहन करण्यात येतंय.


प्रदूषणामुळे वाढतायत कोरोनाचे रूग्ण?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, दिल्लीतील कोरोनाच्या प्रकरणांमध्ये अचानक वाढ होण्यामागे वायू प्रदूषण हा एक मोठा घटक असू शकतो. 


दिल्लीत एप्रिलमध्ये सरासरी प्रदूषण मार्चच्या तुलनेत 19% आणि फेब्रुवारीच्या तुलनेत 11% वाढल्याची नोंद आहे. 20 एप्रिल रोजी स्वीडिश शास्त्रज्ञांनी प्रदूषण आणि कोरोना यांच्यातील संबंधावर प्रकाशित केलेल्या अभ्यासानुसार, प्रदूषणाची पातळी वाढली की कोरोनाची प्रकरणंही वाढू लागतात.


4 एप्रिलपासून वाढतोय कोरोना संक्रमणाचा दर


देशाची राजधानी दिल्लीत एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच कोरोनाचा संसर्ग वाढतानाचं चित्र दिसून आलं होतं. 4 एप्रिल रोजी दिल्लीत 38 दिवसांनंतर कोरोनाचा दररोजचा संसर्ग दर 1 टक्क्यांच्या पुढे गेला होता. त्याचवेळी, गेल्या 1 आठवड्यापासून म्हणजेच 20 एप्रिलपासून दिल्लीत दररोज 1 हजारहून अधिक कोरोनाची प्रकरणं समोर येतायत. दिल्लीत दररोज 1 हजारांहून अधिक केसेस येण्याची प्रक्रिया 68 दिवसांनंतर सुरू झाली आहे.