मुंबई : तुम्हाला हे माहितच असेल की, माणसाच्या अंगावरती काटे उभे राहतात. ते वेगवेगळ्या कारणामुळे येतात, जसे की थंडीच्या मोसमात, जेव्हा अचानक खूप थंडी वाजते तेव्हा शरीर थरथर कापते, तेव्हा आपले केस उभे राहतात. कधी कधी आपण घाबरतो तेव्हा देखील असे घडते. त्याचप्रमाणे काही भावनिक झाल्यावर जसे की, खूप जास्त आनंद झाल्यावरती आपल्या अंगावरती काटे उभे राहतात. पण कधी तुम्ही असा विचार केलाय? की असं का होत असेल? त्यामागचं नेमकं कारण काय असेल?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वैद्यकीय भाषेत, बोलायचं झालं तर असे अंगावरती केस उभे राहण्याला पायलोरेक्शन (piloerection), कटिस अँसेरिना (cutis anserina) किंवा हॉरिपिलेशन (horripilation) म्हणतात. बोली भाषेत आपण त्याला गूजबम्प्स (Goosebumps) म्हणतो किंवा काटा उभा राहणे म्हणतात.


या प्रक्रियेत आपल्या त्वचेवरील जे छिद्र असतात ते वर येतात. जर आपल्या त्वचेलर केस नसतील तर ती त्वचा वर येते. कधीकधी शारीरिक श्रम, लगवी किंवा संडास यांसारख्या दैनंदिन कामातही गुसबंप (Goosebumps) येतात.


काटे येण्यामागचे एक कारण म्हणजे शारीरिक श्रम हे तुमची सहानुभूती आणि नर्व सिस्टीम सक्रिय करते.तर काहीवेळा हे काटे विनाकारण येतात. हे काटे तुम्हाला शरीर उबदार ठेवण्यास मदत करतात. 


जेव्हा तुम्हाला खूप थंडी जाणवते तेव्हा स्नायूंच्या हालचालीमुळे हे गुसबंप (Goosebumps) सक्रिय होतात आणि अशा वेळी शरीर गरम होते. जसजसे तुमचे शरीर तापू लागते तसतसे तुमचे केस किंवा हे  गुसबंप (Goosebumps) हळूहळू गायब होऊ लागतात.


काहीवेळा, एखादी भावना झपाट्याने अनुभवली तरीही,  गुसबंप (Goosebumps) उभे राहतात.  खरं तर, जेव्हा तुम्हाला तीव्र भावना जाणवतात तेव्हा शरीर प्रतिक्रिया देते.


एका अभ्यासानुसार, मूव्ही सीन किंवा अतिशय सुंदर गाण्याचे नेत्रदीपक सादरीकरण यासारखे सामाजिक उत्तेजक दृश्ये पाहणे, गूजबंप्ससह येतात.


तुम्ही जे विचार करता, ऐकता, पाहता, वास घेता, चव घेता, स्पर्श करता. तेव्हा तुमचं शरीर प्रतिक्रिया देतं. शरीराच्या सामान्य प्रतिक्रिया ज्या गूजबंपस ट्रिगर करतात त्यामध्ये त्वचेखालील स्नायूंमध्ये वाढलेली विद्युत क्रिया आणि अधिक मोठा श्वास घेणे हे सगळं शरीरासोबत घडतं. तसेच या सगळ्या प्रतिक्रियांमुळे तुम्हाला घाम येऊ शकतो किंवा तुमच्या हृदयाची गती वाढू शकते. जे नैसर्गिक आहे.