हिंग भारतीय नाही मग कुठून आलं? हिंगाचे जबरदस्त आरोग्यदायी फायदे
Hing Asafoetida Origin And Health Benefits : प्रत्येक भारतीय पदार्थ अगदी चिमुटभर वापरला जाणारा हिंग भारतीय नाही... मग हा हिंग भारतात आला कुठून? त्याचे जबरदस्त आरोग्यदायी फायदे समजून घ्या.
Asafoetida History : सैतानाचे खडे.. म्हणून ओळखला जाणारा, काहीसा उग्र चवीचा हिंग भारतीय पदार्थांत हमखास वापरला जातो. अगदी चिवड्यापासून ते थेट साठवणीतील लोणच्यापर्यंत सगळ्या पदार्थातच हिंगाचा वापर केला जातो. एवढंच नव्हे तर आयुर्वेदानुसार हिंगाचे महत्त्व अधिक आहे. महत्त्वाचं म्हणजे हिंगाची चव ही अगदी प्राचीन काळापासून, रोमन काळापासून आहे. हिंग हा भारतीय पदार्थात हमखास वापरला जात असला तरीही तो भारतीय नाही...
हिंग मुळचे कुठले?
भूमध्यसागरी प्रदेशांमध्ये म्हणजे इराण ओलांडल्यावर सगळीकडे हिंग परिचिच आहे. अलेक्झांडर द ग्रेटच्या मोहिमांनंतर ते युरोपात आल्याचे सांगण्यात येते. भारतात हिंगाचे उत्पादन होत नाही. तो प्रामुख्याने अफगाणिस्तान, उझबेकिस्तान आणि इराणमधून कच्चा माल म्हणून येतो. अलेक्झांडर इशान्य प्राचिन पर्शियाच्या सहलीवरून परतल्यानंतर त्यांना लक्षात आले की उत्तर आफ्रीकेत एक चवदार वनस्पती सापडली आहे. त्याची चव एवढी विलक्षण आहे की त्याचा एखाद्याने स्वाद घेतला तर त्याच्या केवळ काहीश्या उग्र दर्पाने अंगावर शहारे येतील.
असे तयार होते हिंग
हिंगाच्या जाड दुधात मैदा आणि डिंक मिसळून खाण्यायोग्य बनवले जाते. यानंतर नवीन पेस्ट 30 दिवस उन्हात वाळवली जाते. कोरडे करण्यासाठी ड्रायरचा वापर करता येत नाही. कारण यामुळे त्याचा सुवास नष्ट होतो. त्यानंतर याची पावडर तयार केली जाते.
कसे आणि कुठे उगवते हिंगाचे झाड
कच्च्या हिंगाचे घनरूप दूध अफगाणिस्तानच्या उच्च प्रदेशातील हिंदुकुश टेकड्यांमध्ये गोळा केले जाते. हे इराण आणि उझबेकिस्तानच्या थंड भागातही आढळते. आधीच्या काळात बकऱ्याच्या चामडीत बंद करुन ट्रान्सपोर्ट केले जात असते. आता दुधाची पिशवी किंवा जाड प्लास्टिकमध्ये गुंडाळून भारतात आणले जाते.
हिंगाचे आरोग्यदायी फायदे
Anti-Inflammatory Properties: हिंगामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म आहेत जे काही दाहक परिस्थिती कमी करण्यास मदत करू शकतात. त्यात कौमरिन आणि फ्लेव्होनॉइड्स सारखी संयुगे असतात जी शरीरात बॅक्टेरियाची वाढ रोखतात.
Anti-Microbial Activity: हिंगामध्ये नैसर्गिक प्रतिजैविक गुणधर्म असतात. प्राचीन काळी, श्वासोच्छवासाच्या समस्या, खोकला आणि सर्दी यावर नैसर्गिक उपाय म्हणून याचा वापर केला जात असे. त्याची प्रतिजैविक क्रिया हिंगमध्ये असलेल्या फेरुलिक अॅसिड आणि umbelliferone सारख्या संयुगांना कारणीभूत ठरू शकते.
Respiratory Health: श्वसनाशी संबंधित आजारांवर हिंग फायदेशीर आहे, असे मानले जाते. हे रक्तसंचय, खोकला आणि दमा या लक्षणांपासून मुक्त होण्यास मदत करू शकते. काही अभ्यासांनी असे सुचवले आहे की हिंग ब्रोन्कोडायलेटर म्हणून कार्य करू शकते, ज्यामुळे श्वास घेणे आणि बाहेर टाकणे सोपे होते.
Blood Pressure Regulation: हिंग रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी उपयुक्त ठरते. यात संयुगे असतात ज्यांचा रक्तवाहिन्यांवर आरामदायी प्रभाव पडतो, ज्यामुळे रक्तदाब पातळी कमी होण्यास मदत होते.