मुंबई : जगभरात कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनची प्रकरणं वेगाने वाढतायत. देशात दिल्ली, मुंबई सारख्या मोठ्या शहरांमध्ये दररोज नवीन प्रकरणं समोर येताय. ओमायक्रॉन डेल्टाच्या तुलनेत अतिशय सौम्य असल्याचं म्हटलं जातंय. मात्र ओमायक्रॉनचा प्रसर वेगाने होत असून तज्ज्ञही यामुळे आश्चर्यचकित झाले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, डब्ल्यूएचओच्या तांत्रिक प्रमुख मारिया व्हॅन केरखोव्ह यांनी शुक्रवारी ओमायक्रॉनच्या वेगाने का पसरतोय याची कारणं सांगितली आहेत. 


केरखोव्ह म्हणाले की, गेल्या आठवड्यात कोरोनाच्या विक्रमी रुग्णांची नोंद झाली. ही आकडेवारी गेल्या आठवड्याच्या तुलनेत 71 टक्क्यांनी जास्त होती. नवीन ओमायक्रॉन व्हेरिएंट अनेक कारणांमुळे लोकांमध्ये वेगाने पसरतोय.


'पहिलं म्हणजे नव्या व्हेरिएंटमधील म्युटेशन व्हायरसला मानवी पेशींशी सहजपणे बांधून ठेवण्यास मदत करतात. दुसरं, नवीन व्हेरिएंटमध्ये रोगप्रतिकारक शक्ती टाळण्याची क्षमता आहे. परिणामी, लोकांना पुन्हा संसर्ग होण्याचा धोका वाढतो. म्हणजेच, ज्यांना याआधी संसर्ग झालाय किंवा ज्यांचं लसीकरण झालंय त्यांना ओमायक्रॉनचा धोका टाळणं कठीण आहे, असं मारिया यांनी सांगितलंय.


तिसरे कारण सांगताना मारिया म्हणाल्या, "ओमिक्रॉनमध्ये आम्ही अपर रेस्पिरेटरी ट्रॅक्टमध्ये व्हायरसला रेप्लिकेट होताना पाहिलंय. हे डेल्टा किंवा इतर कोणत्याही व्हेरिएंटपेक्षा पूर्णपणे वेगळं आहे." कोरोनाचे पूर्वीचे व्हेरिएंट फुफ्फुसातील लोअर रेस्पिरेटरी ट्रॅक्टमध्ये रेप्लिकेट होत होते. ज्यामुळे त्याची पुढे जाण्याची क्षमता कमी होती.