Stroke-Heart Attack Risk in Winter: यंदा थंडीचा कडाका चांगलाच जाणवत आहे (Winter Started). कडाक्याच्या थंडीमुळे सध्या हार्ट अटॅक (Heart Attak) आणि ब्रेन स्ट्रोकचा (Stroke Risk) धोका वाढला आहे.  हाय कोलेस्ट्रॉल (High Choleterol), हाय तसेच लो ब्लड प्रेशर (High or Low Blood Pressure), थिक ब्लड (Thick Blood) आणि ब्लड क्लॉटिंग (Blood Clotting) या सारख्या समस्यांनी ग्रस्त असलेल्यांना ब्रेन स्ट्रोक आणि हार्ट अटॅकचा धोका सर्वाधिक आहे. अभिनेत्री श्रीदेवीचा मृत्यू देखील बाथरुमध्येच झाला होता.  हार्ट अटॅकने तिचा मृत्यू झाल्याचे बोलले जाते.  मात्र, जास्तीत जास्त लोकांना  ब्रेन स्ट्रोक अथवा हार्ट अटॅकचा झटका हा बाथरुमध्येच असताना येत आहे. बाथरुमध्येच ब्रेन स्ट्रोक अथवा हार्ट अटॅकचा झटका का येतोय यामागे  धक्कादायक कारण समोर आले आहे. 


हिवाळ्यात हार्ट अटॅकचा धोका अधिक का असतो?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हिवाळ्यात हार्ट अटॅकचा (Heart Attack) धोका अधिक असतो. पहाटे थंडी जास्त असल्यास रक्तवाहिन्या (Blood Vessels) आकुंचन पावतात आणि त्यामुळे अटॅक येण्याच्या प्रमाणात वाढ होते.  अति थंडीत रक्तवाहिनी बंद होऊन हार्ट अटॅक, ब्रेन स्ट्रोकची शक्यता होऊ शकते. तसंच हिवाळ्यामध्ये हार्मोनल चेंजेस होतात हे देखील यामागचे एक कारण आहे. 


सर्वाधिक स्ट्रोक किंवा हार्ट अटॅकची समस्या फक्त बाथरूममध्येच का येते


सर्वाधिक स्ट्रोक किंवा हार्ट अटॅकची समस्या फक्त बाथरूममध्येच का येते असा प्रश्न उपस्थित झाला आहे.  हा धोका केवळ उच्च कोलेस्ट्रॉल, जाड रक्त किंवा रक्त गोठलेल्या रुग्णांनाच नाही तर कोणालाही होऊ शकतो. आंघोळ करताना एका छोट्याशा चुकीमुळे असे घडत असल्याचे समोर आले आहे. बरेचजण अंघोळ करताना आधी डोक्यावर पाणी टाकतात.  तर ही चूक तुमच्यासाठी घातक ठरू शकते. अंघोळ करताना कोणत्याही ऋतूत आधी डोक्यावर पाणी टाकू नये. प्रथम पायांवर, नंतर कंबरेवर, मानेवर आणि शेवटी डोक्यावर पाणी घ्यावे. 


थेट डोक्यावर थंड पाणी टाकल्याने केशिका शिरा आकुंचन पावण्याचा धोका असतो. रक्तवाहिन्या आकुंचन पावल्यामुळे रक्ताभिसरण बिघडते आणि अचानक रक्तदाब वाढतो. थंड पाण्यामुळे डोक्याच्या शिरा आकसतात आणि रक्ताच्या दाबामुळे त्या शिरा तुटू शकतात. यामुळे पक्षाघाताचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यासह हृदयाला योग्य रक्तपुरवठा होत नसल्यामुळे हार्ट अटॅकचा झटका येवू शकतो.


शरीरातील रक्ताभिसरण डोक्यापासून ते पायाच्या नखापर्यंत होते असते. थंड पाणी डोक्यावर पडताच रक्तवाहिन्या आकसतात आणि रक्ताभिसरण अतिशय मंद होते. यामुळे स्ट्रोक आणि अटॅकचा धोका निर्माण होऊ शकतो. अनेक वेळा थंड पाणी डोक्यावर पडताच मेंदूच्या नसा फुटतात. यामुळे बाथरूममध्ये स्ट्रोक किंवा हृदयविकाराचा झटका येण्याचा सर्वाधिक धोका अधिक असतो. यामुळेत थंडीत काळजी घेणे गरजेचे आहे. व्यायम, पुरेशी झोप, सकस आहार घेतला पाहिजे. तसेच ताण तणापावासून दूर राहणे आवश्यक आहे.