महाराष्ट्रात आहे आशिया खंडातील सर्वात उंच धबधबा! 1840 फूट उंची, सरळ उभ्या दगडावरून धो धो कोसळतो

आशिया खंडातील सर्वात उंच धबधबा अशी ओळख असलेला धबधबा आपल्या महाराष्ट्रात आहे. या धबधब्याचे नाव काय आणि हा धबधबा कुठे आहे ते जाणून घेऊया.

| Jun 10, 2024, 18:23 PM IST

Satara Bhambavli Vajrai Waterfall : पावसाळा सुरु झाला की सर्वांनाच धबधब्यात भिजण्याचा मोह अनावर होतो. धबधबा दिसला तरी मन हरखून जाते. डोंगरदऱ्यातून धो धो कोसळणारे धबधबे पर्यटकांना आकर्षित करतात. महाराष्ट्रात असे इनेक प्रसिद्ध धबधबे आहेत.  आशिया खंडातील सर्वात उंच धबधबा आपल्या महाराष्ट्रात आहे. हा धबधबा जवळपास 1840 फूट उंचीवरुन कोसळते. महाराष्ट्रातील हा सर्वात सुंदर धबधबा आहे. 

 

1/7

महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात देशातील सर्वांत उंच धबधबा आहे.

2/7

या धबधब्यावर पर्यटक निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी येतायत. सातारा शहरातून 32 किमी अंतरावर असलेल्या  भांबवली गावातून या धबधब्यापर्यंत पोहचता येते. 

3/7

कास तलावापासून पुढे 5 किलोमीटर अंतरावर या धबधब्याचे विहंगम दृष्य पहायला मिळते.

4/7

उरमोडी नदी हे या धबधब्याचे उगमस्थान आहे.   

5/7

 हा धबधबा सरळ उभ्या दगडावरून तीन टप्प्यात कोसळतो. 

6/7

 या धबधब्याची उंची तब्बल 1 हजार 840 फूट आहे.

7/7

भांबवली वजराई असे या धबधब्याचे नाव आहे. घनदाट जंगलात हा धबधबा दडलेला आहे.