रिकाम्या पोटी तूप खाण्याचा ट्रेंड इतका लोकप्रिय का होतोय? तज्ज्ञ सांगतात की...
देशी तूप हे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे आपल्या घरात प्रत्येक जण सांगतात. आरोग्य तज्ज्ञंही म्हणतात की, दररोज काही प्रमाणात तूपाचं सेवन करायला पाहिजे. पण रिकाम्या पोटी तूप खाण्याचा ट्रेंड मागे काय आहे सत्य जाणून घ्या.
Ghee Benefits : हे युग सोशल मीडियाचं आहे हे म्हणं वावग ठरणार नाही. आज प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन असल्याने घटना असो किंवा एखाद्या गोष्टीची माहिती ती लगेचच सर्वांना कळतं. सध्या सोशल मीडियावर एक वेगळाच ट्रेंड पाहिला मिळतोय. ज्यामध्ये रिकाम्या पोटी तूप खाण्याचे फायदे लोकांना सांगण्यात येतं आहे. खरं तर घरातील आई, आजी आपल्या तूप खाण्याचे आरोग्यासाठी फायदेशीर आहे, हे कायम सांगतात. पण तरुण पिढी वजन वाढतं म्हणून तुपाचं सेवन करत नाहीत. आयुर्वेदातही तूप सेवनाचे आरोग्यादायी फायदे वेळोवेळी सांगते जातात. तूपामध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड आणि व्हिटॅमिन ए आढळतं. अशात रिकाम्या पोटी तूप खाण्याचे किती फायदे आहेत तज्ज्ञ याबद्दल काय सांगतात जाणून घ्या. (Why is the trend of eating ghee on an empty stomach becoming so popular Experts say)
रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यास फायदेशीर
तूप हे ब्युटीरिक ऍसिडमध्ये समृद्ध असल्याने शरीराला रोगाशी लढणाऱ्या टी-सेल्स तयार हे उपयुक्त ठरते. त्यामुळे रिकाम्या पोटी तूपाचं सेवन केल्यास फायदा मिळतो.
पचनसंस्था सुधारते
तूपामध्ये पोषक तत्वांनी समृद्ध असल्याने त्याच्या सेवनामुळे पचनशक्ती मजबूत होण्यास मदत मिळते. रोज सकाळी रिकाम्या पोटी एक चमचा तूप खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते. तुपाच्या सेवनाचा पोट निरोगी राहतं आणि त्यामुळे अल्सर आणि कॅन्सरसारख्या आजारांचा धोकाही कमी होतो, असं तज्ज्ञ सांगतात.
वजन कमी करण्यास मदत
तुपाचे सेवन वजन नियंत्रित ठेवण्यासही उपयुक्त आहे असं डायट्रेशियन ऋतुजा दिवेकर यांनीही सांगितलंय. तूप पोटाची चरबी कमी करण्यास मदत करतं शिवाय चयापचय गतिमान करुन अतिरिक्त चरबी घटवण्यास मदत करतं. सकाळी रिकाम्या पोटी तुपाचे सेवन केल्याने भूक नियंत्रित राहण्यास मदत मिळते.
त्वचेसाठी वरदान
तुपाचा वापर तुमच्या त्वचेसाठी वरदान मानले जातात. तूपात आढळणारे जीवनसत्त्वे त्वचेला घट्ट ठेवण्यास मदत करतं. प्राचीन काळापासून तूपाचं सौंदर्य टिकवण्यासाठी वापर केला जातो. हे चेहऱ्यावर लावल्याने त्वचा मुलायम आणि चमकदार राहते.
केस निरोगी ठेवतात
तूपामध्ये व्हिटॅमिन ई असून ते केस आणि स्कॅल्पसाठी खूप फायदेशीर आहे. त्यात मॉइश्चरायझिंग गुणधर्म असून टाळूवरील कोरडेपणा आणि खाज सुटणे या समस्यावर ते रामबाण आहे.
हाडे मजबूत ठेवते
तूप देखील हाडांना मजबूती ठेवण्यास मदत करतो. व्हिटॅमिन के भरपूर प्रमाणामत असल्याने कॅल्शियम शोषण्यास ते मदतगार ठरतं. दात किडण्यापासूनही तूपाचं सेवन फायदेशीर आहे.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)