मुंबई : आपल्याकडे लग्न करताना मुलीच्या वयापेक्षा जास्त वयाचा मुलगा बघितला जातो. मात्र अनेक वर्षांपासून चालू असलेली ही परंपरा काळानुसार बदलत आहे. आजकालचा मुला-मुलींचा पसंतीचा ट्रेंड बदलला आहे. त्यांचे प्राधान्यक्रम, विचार बदलल्याने हा मुला-मुलींचा कल बदललेला पाहायला मिळत आहे. काहींना आपल्यापेक्षा वयाने खूप मोठा मुलगा लग्नासाठी भावतो तर काही मुली आपल्याहुन लहान मुलाच्या प्रेमात पडतात. यामागची कारणे मात्र फार इंटरेस्टींग आहेत. जाणून घेऊया मुलींना लग्नासाठी आपल्याहून कमी वयाची मुले अधिक का भावतात...


बालिशपणा आणि निरागसता


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपल्यापेक्षा वयाने लहान मुले अधिक अॅक्टीव्ह आणि स्पोर्टी असतात. रोज नवनव्या गोष्टी शिकण्यास किंवा नव्या गोष्टींबद्दल अधिक प्रयोगशील असतात. त्यांच्यासोबत असताना मुलींना त्यांचे खरे वय लक्षातही येत नाही. अशा मुलांसोबत राहिल्याने मुली स्वतःला तरुण आणि फिट समजू लागतात.


रोमांटिक


वयाने लहान मुलांशी लग्न केल्यास जीवनात रोमांस नेहमी टिकून राहतो. असा पार्टनर समजूदारपणाने आणि नटखट अंदाजाने तुम्हाला नेहमी इंप्रेस करेल.


अनुभव शेअर करु शकता


आपल्या वयाहून लहान मुलाशी लग्न केल्यास तुम्हाला अनेक गोष्टींचा त्याचाहून अधिक अनुभव असेल. त्याचबरोबर करिअरही सेटल असल्याने तुम्ही पार्टनरसोबत तुमचे अनुभव शेअर करु शकाल. त्याचबरोबर तो तुमचे  म्हणणए शांतपणे ऐकूनही घेईल.