कोरोनानंतर मंकीपॉक्स जगासाठी डोकेदुखी ठरणार? WHO म्हणालं....
कोरोना व्हायरसनंतर (Corona virus) आता जगभरात मंकीपॉक्स (Monkeypox virus) विषाणूच्या वाढत्या रुग्णांमुळे लोकांची चिंता वाढली आहे.
मुंबई : कोरोना व्हायरसनंतर (Corona virus) आता जगभरात मंकीपॉक्स (Monkeypox virus) विषाणूच्या वाढत्या रुग्णांमुळे लोकांची चिंता वाढली आहे. आतापर्यंत 24 देशांमध्ये या विषाणूची 435 हून अधिक प्रकरणांची नोंद करण्यात आली आहे. मंकीपॉक्सचा धोका असतानाच पुढील जागतिक महामारीचे कारण बनू शकतं अशी शंका व्यक्त केली जात आहे. याबाबत जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) म्हटलंय. मंकीपॉक्स वैश्विक महामारीचं कारण असू शकतं असं म्हणनं धाडसाचं ठरेल, असं डब्लूएचओकडून स्पष्ट करण्यात आलंय. (will monkey pox virus be the cause of the next pandemic after covid see what says world health orgnisation)
डब्ल्यूएचओनुसार, आफ्रिकेबाहेरील महामारी नसलेल्या देशांमध्ये वाढलेल्या प्रकरणांशी संबंधित बरीच माहिती अद्याप निश्चित केलेली नाही. तसेच मंकीपॉक्सकडे कोरोना प्रमाणे पाहू नये, असंही मीडिया सारखा विषाणू दिसू नये. सर्वसामान्यांना कमी धोका असतो.
कोरोनापेक्षा वेगळा मंकीपॉक्स वेगळा
"लोकांनी घाबरावं तसेच मंकीपॉक्स कोरोनापेक्षा भयंकर असल्याचा विचार करावा, असा आमचा हेतू नाही. मंकीपॉक्स हा कोरोनासारखा नसून तो वेगळा विषाणू आहे", असं डब्ल्यूएचओचे संचालक सिल्वी ब्रायंड म्हणाले. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
समलैंगिक संबंध ठेवणाऱ्यांना सावधानतेचा इशारा
हा विषाणू प्रथमच समलिंगी पुरुषांमध्ये दिसून आला आहे. मात्र या विषाणूची व्याख्या लैंगिक संक्रमित रोग म्हणून करण्यात आलेली नाही. लुईस यांनी समलिंगी संबंध ठेवणाऱ्या पुरुषांनी सावधगिरी बाळगावी, असं आवाहन करण्यात आलंय.