हिवाळ्यात लहान मुलांंच्या त्वचेची काळजी घेण्यासाठी खास टीप्स
हिवाळ्याच्या दिवसामध्ये लहान मुलांच्याही त्वचेची विशेष काळजी घेणं गरजेचे आहे.
मुंबई : हिवाळ्याच्या दिवसामध्ये लहान मुलांच्याही त्वचेची विशेष काळजी घेणं गरजेचे आहे.
शरीरात उष्णता निर्माण होण्यासाठी जसे उबदार कपडे आणि पोषक आहार गरजेचा आहे तशीच त्वचेची काळजी घ्या.
तेलाचा मसाज
हिवाळ्याच्या दिवसामध्ये लहान मुलांना आंघोळीपूर्वी तेलाचा मसाज करा.नियमित २-३ वेळेस तेलाचा मसाज केल्यास करा. यामुळे त्वचेचा टोन सुधारेल.
नेहमी डोक्यावरून आंघोळ टाळा
हिवाळ्याच्या दिवसात लहान मुलांना रोज डोक्यावरून आंघोळ घालणं टाळा. नियमित आंघोळीसाठी कोमट पाण्याचा वापर करा. गरम पाण्यामुळे त्वचेला त्रास होऊ शकतो.
मॉईश्चरायझर
ऑलिव्ह ऑईल किंवा बदामाच्या तेलाचा मसाज त्वचेला पोषक ठरू शकतो. यामुळे सहाजिकच त्वचेचे मॉईश्चर सुधारते. परिणामी बाळाची त्वचा या दिवसातही मऊ राहते.
माईल्ड शाम्पू
लहान मुलांसाठी हर्ब्सयुक्त माईल्ड शाम्पू किंवा साबणाचा वापर करा.
डायपर रॅश क्रीम
डायपर रॅश त्रासदायक ठरतात. त्यामुळे डायपर रॅश क्रीम निवडताना सोबत बदामाचं तेल, यशदा भस्म यांचा समावेश करावा.