पुरूषांच्या तुलनेत स्त्रियांना या `7` आजारांंचा धोका अधिक !
`स्त्री` ही आपल्या समाजाची आणि कुटुंबाची आधारस्तंभ आहे. त्यामुळे अनेकदा स्त्रिया स्वतःच्या आरोग्यापेक्षा इतर गोष्टींना अधिक प्राधान्य देते. परिणामी नकळत एका विशिष्ट टप्प्यावर काही त्रास खूपच गंभीर होऊन बसतात.
मुंबई : 'स्त्री' ही आपल्या समाजाची आणि कुटुंबाची आधारस्तंभ आहे. त्यामुळे अनेकदा स्त्रिया स्वतःच्या आरोग्यापेक्षा इतर गोष्टींना अधिक प्राधान्य देते. परिणामी नकळत एका विशिष्ट टप्प्यावर काही त्रास खूपच गंभीर होऊन बसतात.
काही आजारांचा धोका हा पुरूषांच्या तुलनेत स्त्रियांना अधिक असतो. त्यामुळे सुरूवातीपासूनच प्रत्येक स्त्रीने या काही आजारांकडे मूळीच दुर्लक्ष करू नये. कारण या आजारांचा धोका स्त्रीयांना अधिक असतो.
हृद्यविकार :
आजकाल आबालवृद्धांमध्ये कोणाचाही मृत्यू हृद्यविकाराच्या झटक्याने होत असल्याचे वृत्त अनेकदा आपण पाहिले आहे. एका अहवालानुसार हृद्यविकाराच्या झटक्याने मृत्यू होण्याचे प्रमाण हे पुरूषांच्या तुलनेत महिलांचे अधिक आहे.
ऑस्टोपोरायसिस :
पुरूषांच्या तुलनेत स्त्रियांची हाडं ठिसुळ आणि कमजोर असतात. वयाच्या विविध टप्प्यांवर स्त्रियांच्या शरीरात अनेक हार्मोनल बदल होतात. महिलांच्या शरीरात मोनोपॉजच्या काळात किंवा थायरॉईड हार्मोनच्या पातळीत चढउतार झाल्याने हाडांची डेन्सिटी कमी होते. परिणामी ऑस्टोपोरायसिसचा त्रास गंभीर होण्याची शक्यता महिलांना अधिक असते.
अर्थ्राइटिस :
स्त्रियांना नव्या जीवाला जन्म देण्याची क्षमता असते. यामुळे तिचं शरीर पुरूषांपेक्षा वेगळ्या ठेवणीतील असते. तिच्या हाडांची डेन्सिटी कमी असते. शरीराच्या कंबरेखालील भाग अधिक नाजूक असतो. परिणामी पुरूषांच्या तुलनेत स्त्रियांना इजा होण्याचा धोका अधिक असतो.
गॅस्ट्रोइन्सटेशनल प्रॉब्लेम :
पुरूषांच्या तुलनेत स्त्रियांमध्ये गॅस्ट्रोइन्सटेशनल आजार अधिक असतात. मेंदूच्या रचनेतील भिन्नपणा आणि न्युरोट्रान्समीटर्समुळे गॅस्ट्रोइन्सटेशनलचे आजार अधिक गंभीर होतात.
अल्झायमर :
अल्झायमरच्या रुग्णांमध्ये स्त्रियांचे प्रमाण अधिक आहे. एकूण 2/3 रूग्ण या स्त्रिया आहेत. स्त्रियांमधील जेनेटिक इन्फ्लुएन्स, हार्मोनल अॅक्टिव्हिटीज, मेंदूतील रचनांमधील बदल, कामांमधील बदल, जीवनशैलीतील भिन्नपणा यामुळे अल्झायमरचा धोका स्त्रियांना अधिक असतो.
नैराश्य :
पुरूषांच्या तुलनेत स्त्रियांमध्ये नैराश्याचे प्रमाण अधिक असते. स्त्रियांमध्ये काही आजारांशी निगडीत नैराश्य महिलांना अधिक सतावते. यामध्ये पीएमएस, गरोदरपणादरम्यान, गरोदरपणानंतर नैराश्याचा सामना करतात. याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर होतो.
लैंगिक आजार :
स्त्री शरीराच्या रचनेमुळे एसटीडी म्हणजेच लैंगिक आजाराचा धोका अधिक असतो. स्त्रीयांच्या योनिमार्गाजवळील त्वचा नाजूक असते. या भागावर ओलावा अधिक असल्याने जंतू संसर्ग अधिक बळावतो.