Heart Attack: महिलांमध्ये हार्ट अटॅक येण्यापूर्वी दिसतात ही लक्षणं, याकडे दुर्लक्ष करू नका
जीवनशैली बदल्यामुळे गेल्या काही वर्षात हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होण्याचं प्रमाण वाढलं आहे. कमी वयाच्या लोकांनाही हृदयविकाराचा त्रास जाणवतो.
Heart Attack Women Symptoms: जीवनशैली बदल्यामुळे गेल्या काही वर्षात हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होण्याचं प्रमाण वाढलं आहे. कमी वयाच्या लोकांनाही हृदयविकाराचा त्रास जाणवतो. चुकीचा आहार, शारीरिक हालचाली कमी होत असल्याने हृदयविकाराच्या (Heart Attack) समस्या वाढल्या आहेत. चुकीच्या सवयींमुळे हृदयाला रक्तपुरवठा करण्याऱ्या धमण्यांमध्ये ब्लॉकेज तयार होतात आणि हृदयविकाराचा त्रास वाढत जातो. त्याकडे दुर्लक्ष केल्यास हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू होऊ शकतो. ब्रिटीश हार्ट फाउंडेशनच्या मते पुरुषांच्या तुलनेत महिलांना हृदयविकाराची काही लक्षणं आधीच दिसून येतात. चला तर जाणून घेऊयात हृदयविकाराचा त्रास सुरु होण्यापूर्वी महिलांमध्ये काय लक्षणं दिसतात.
पचनसंबंधी समस्या- मळमळ पुरुष आणि स्त्रियांमध्ये हृदयविकाराच्या झटक्याचे मुख्य लक्षण असू शकते. अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनात असे म्हटले आहे. हृदयविकाराच्या झटक्याची लक्षणे असलेल्या 34 टक्के महिलांना मळमळ जाणवत होती. त्याच वेळी, महिलांच्या तुलनेत 22 टक्के पुरुषांना मळमळ जाणवली. जबडा, मान, पाठ, हात किंवा खांदे दुखणे हे हृदयविकाराच्या लक्षणांपैकी एक आहे.
हातांना मुंग्या येणे- हाताला मुंग्या येणे किंवा काही भाग बधीर होणे, हे देखील हृदयविकाराची लक्षणं आहेत. कधीकधी जास्त वेळ चुकीच्या स्थितीत झोपल्यामुळे सुद्धा हाताला मुंग्या येतात. संशोधनानुसार, एका किंवा दोन्ही हातांमध्ये अचानक बधीरपणा येणे, हे हृदयविकाराचा झटका किंवा पक्षाघाताचे लक्षण असू शकते.
Tea: चहासोबत गोड बिस्किटे खात असाल तर सावधान! भोगावे लागतील असे परिणाम
इतर लक्षणे- छातीत दुखणे, अस्वस्थता यांचा इतर लक्षणांमध्ये समावेश आहे. हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी हलकी डोकेदुखी किंवा धाप लागू शकते. वारंवार खोकला येणे किंवा पॅनीक अटॅकसारखे वाटतं.
(Disclaimer : येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. ते अवलंबण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)