Tea: चहासोबत गोड बिस्किटे खात असाल तर सावधान! भोगावे लागतील असे परिणाम

आज आम्‍ही तुम्‍हाला सांगणार आहोत की, चहासोबत खालेल्ल्‍या (Combinations Of Food) कोणत्‍या गोष्टी तुमच्‍यासाठी हानिकारक ठरू शकतात.

Updated: Sep 25, 2022, 05:58 PM IST
Tea: चहासोबत गोड बिस्किटे खात असाल तर सावधान! भोगावे लागतील असे परिणाम title=

Food and Tea Combinations: अनेक जण आपल्या दिवसाची सुरुवात चहाने करतात. काहींना सकाळी चहा मिळाला नाही तर त्यांची डोकेदुखी सुरू होते. काही लोकांना चहाबरोबर (Tea) काहीतरी खाणे आवडते. आजच्या धकाधकीच्या जीवनात अनेक लोक सतत चहा पित असतात. पण सतत चहा पिणे आरोग्यास फार धोकादायक असतं.  6-7 तासाच्या झोपेनंतर सकाळी उठल्या उठल्या पहिला चहा पिणं आरोग्याला अपायकारक आहे. यामुळे पचनसंस्थेचे आरोग्य बिघडते. अचानक अस्वस्थ्य वाटणं, उलटी होणं हा त्रास जाणवतो. आज आम्‍ही तुम्‍हाला सांगणार आहोत की, चहासोबत खालेल्ल्‍या (Combinations Of Food) कोणत्‍या गोष्टी तुमच्‍यासाठी हानिकारक ठरू शकतात.

चहासोबत अंडी खाणं पडेल महागात

अनेकांना चहासोबत अंडी खायला आवडतात. या दोन्हींचे एकत्र सेवन करणे तुमच्या आरोग्यासाठी खूप हानिकारक आहे. कारण जेव्हा चहाच्या पानात असलेले टॅनिक अॅसिड अंड्यातील प्रथिनांमध्ये मिसळते तेव्हा अॅसिड प्रोटीन कपाउंड तयार करतात. ज्यामुळे बद्धकोष्ठता आणि मूळव्याध होण्याचा धोका वाढतो.

गोड बिस्किटे

बहुतेकांना चहासोबत गोड बिस्किटे खायला आवडतात. चहासोबत गोड बिस्किटे खाल्ल्याने साखरेचा धोका वाढतो. जर शरीरात साखरेचे प्रमाण जास्त असेल तर त्यामुळे चेहऱ्यावर मुरुमे येऊ शकतात, याशिवाय चेहऱ्यावर सुरकुत्याही येऊ शकतात.

बेसनापासून बनवलेल्या वस्तू

पावसाळ्यात चहासोबत भजी खाणं खूप आवडतं. पण तज्ज्ञांच्या मते बेसनापासून बनवलेल्या गोष्टी चहासोबत घेतल्यास त्याचा शरीरावर चुकीचा परिणाम होतो. या दोन गोष्टींचे एकत्र सेवन केल्याने शरीरात आवश्यक पोषक तत्वांची कमतरता होते आणि पोटाशी संबंधित समस्याही होऊ लागतात.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. अवलंब करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)