मासिकपाळी थांबवायची किंवा पुढे ढकलायची असेल, तर हे घरगुती उपाय करतील मदत
तुम्हाला काही महत्त्वाच्या कामामुळे मासिकपाळी काही दिवस पुढे ढकलायची असेल, तर तुम्ही औषधांऐवजी घरगुती उपाय करून ते करू शकता.
मुंबई : महिलांना दर महिन्याला मासिकपाळी येते. ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. जी तिच्या सायकल प्रमाणे येते. ज्यामध्ये काही महिलांची मासिकपाळी तारखेला येते, तर काहींची तारखेनंतर. मासिकपाळीची तारीख ही मागेपुढे होत असते. परंतु बऱ्याचदा महिलांना असं वाटंत असतं की, त्यांची मासिकपाळी उशीरा आली तर बरं होईल.
अनेक स्त्रियांना कोणतीही पूजा किंवा लग्न किंवा ऑफिसची कोणतीही महत्त्वाची मीटिंग, पिकनीक यामुळे पिरियड पुढे ढकलण्यासाठी औषधे घेतात. पण या औषधांचे साइड इफेक्ट्स देखील आहेत, हे जाणून घेऊया. यामुळे हार्मोनल असंतुलन होण्याची भीती असते, ज्यामुळे शरीरात अनेक बदल दिसून येतात.
परंतु तुम्हालाही काही महत्त्वाच्या कामामुळे मासिकपाळी काही दिवस पुढे ढकलायची असेल, तर तुम्ही औषधांऐवजी घरगुती उपाय करून ते करू शकता. नैसर्गिक पद्धतीने मासिक पाळी उशिरा आल्याने त्याचे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत.
व्हिनेगर
मासिक पाळी लांबवण्यासाठी व्हिनेगरचे सेवन खूप प्रभावी आहे.एक ग्लास पाणी घेऊन त्यात तीन ते चार चमचे व्हिनेगर टाकून दिवसातून दोन ते तीन वेळा प्या. यासह, मासिक पाळी तीन ते चार दिवस पुढे ढकलली जाऊ शकते.
लिंबू
व्हिटॅमिन सी समृद्ध लिंबू मासिक पाळी टाळण्यासाठी, रक्त प्रवाह नियंत्रित करण्यासाठी किंवा थांबवण्याचे काम करते. यासोबतच लिंबू मासिक पाळीशी संबंधित समस्याही कमी करते. यासाठी पाण्यात लिंबू मिसळून त्याचे सेवन करा आणि ते पूर्णपणे नैसर्गिक आहे.
मोहरी
मोहरीच्या दाण्यांमध्ये मॅग्नेशियम, सेलेनियम, जस्त आणि लोह यांसारखे अनेक पोषक घटक असतात. दोन चमचे मोहरी पावडर घेऊन, त्यात एक कप कोमट दुधात मिसळून आठवड्यातून एकदा प्या. या रेसिपीचा अवलंब केल्यास काही दिवस मासिक पाळी टाळता येते.
जिलेटिन
एक कप पाणी घ्या आणि त्यात जिलेटिनचे पॅकेट विरघळवून प्या. यासह, मासिक पाळी तीन ते चार तासांसाठी पुढे ढकलली जाऊ शकते. तुम्ही हे काही काळासाठी करू शकता, परंतु नैसर्गिक पद्धत असूनही, हा उपाय दीर्घकाळ करु नका.
मसालेदार अन्नापासून दूर रहा
जर तुम्हाला तुमची पाळी काही दिवस लांब ढकलायची असेल, तर लाल तिखट, काळी मिरी, लसूण आणि गरम मसाले खाणे टाळा. वास्तविक, जास्त मसालेदार अन्न खाल्ल्याने रक्तप्रवाह वाढतो, ज्यामुळे मासिक पाळी येण्याची शक्यता वाढते. अशा परिस्थितीत मासिक पाळीच्या तारखेपूर्वी मसालेदार पदार्थ खाऊ नका.
(विशेष सूचना: इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)