मुंबई: तरूण असताना शरीर बहुतांश चुका माफ करते. पण, वय वाढू लागते तसतसे शरीर तुमच्या तरूणपणात दिलेल्या माफीला शिक्षा देण्यास सुरूवात करते. थेटच सांगायचे तर, वाढत्या वयासोबत शरीर तितके तंदुरूस्त राहात नाही. त्यामुळे योग्य वयात डॉक्टरांकडून शरीराची योग्य ती तपासणी करून घेणे महत्त्वाचे ठरते. म्हणूनच वयाची तिशी पार केलेल्या किंवा करत असलेल्या महिलांसाठी आज आम्ही काही सल्ला देणार आहोत. वयाची तिशी पार केलेल्या महिलांनी पुढील प्रकारची शारीरिक तपासणी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.


थायरॉईड टेस्ट


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तिशी पार केलेल्या महिलांनी थायरॉईड टेस्ट करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण वाढत्या वयासोबत अनेक महिला लठ्ठ होताना दिसतात. अनेकदा हा लठ्ठपणा थायरॉईडमुळे वाढलेला असू शकतो. 


व्हिटॅमिन डी


महिलांना होणाऱ्या आरोग्याच्या त्रासांपैकी बहुतांश त्रास हा व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे होतो. वाढत्या वयासोबत हे व्हिटॅमिन कमी होण्याचा संभव वाढतो. व्हिटॅमिन डी हा फॅटमध्ये मिसळणाऱ्या प्रो-हार्मोन्सचा समूह आहे.  


मधुमेह


जर तुम्ही वयाची तिशी पार केली आहे तर, मधुमेह आणि यूरीनची टेस्ट करायला अजिबात विसरून नका. इतकेच नव्हे तर, तुम्ही प्रत्येक दोन वर्षातून एकदा तरी नियमीत आरोग्यतपासणी करून घ्यावी. 


नैराश्य चाचणी


नोकरी, धावपळ, कौटुंबिक ताण त्यातून येणारा एकटेपणा यामुळे तीशी-चाळीशीमध्ये अनेकांना नैराश्येने ग्रासले जाते. हा त्रास सुरूवातीला साधारण असला तरी, भविष्यात हा त्रास वाढत जातो. त्यामुळे याही त्रासाबाबतची चाचणी महिलांनी करून घेणे आवश्यक आहे.


बीएमआय टेस्ट


वयाची तीशी पार केली की, महिलांनी बीएमआय (बॉडी मास इंडेक्स) करणे अत्यंत गरजेचे आहे. वर्षातून किमान एक वेळा तरी महिलांनी ही टेस्ट करून घ्यावी. 


ब्लड प्रेशर


ही चाचणी तर आता साधारण झाली आहे. ब्लडप्रेशमुळे किडनी, हृदय, ब्रेन स्ट्रोक अधींचा धोका वाढतो. त्यामुळे ब्लड प्रेशरची चाचणी करायलाच हवी.


ब्रेस्टची तपासनी (Gyn Checkup)


अनेक महिलांना स्थानाचा कर्करोग होण्याची शक्यता असते. त्यामुळे हा धोका टाळायचा असेल किंवा वेळीच या त्रासावर उपाय करायचा असेल तर या प्रकारच्या चाचण्या नियमीत करणे महत्त्वाचे आहे.