मुंबई : स्त्रिया पॉर्न पाहतात का असे विचारले तर त्याचे उत्तर होय असे आहे... जशा पुरुषांच्या स्वतःच्या इच्छा असतात त्याचप्रमाणे स्त्रियांच्याही काही गरजा आणि इच्छा असतात. आजही याबद्दल बोलायला आपण संकोच करतो. पॉर्न पाहणे आजही चुकीचं मानलं जातं!  स्त्रिया देखील पॉर्न पाहतात परंतू त्यांच्या आरोग्यासाठी कितपत योग्य ठरू शकतं हे पाहू..


महिला पॉर्न का पाहतात?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका इंग्रजी वृत्तसंस्थेने केलेल्या सर्वेनुसार भारतात एकूण पॉर्न पाहणाऱ्यांमध्ये १/३ महिला आहेत. पुरूष ज्या कारणामुळे पॉर्न पाहतात त्याच कारणामुळे महिलादेखील पॉर्न पाहतात. मास्टरबेशन (Masturbation) ही अत्यंत खासगी आणि नैसर्गिक बाब आहे. त्यासाठी अनेक महिला पॉर्नच्या माध्यमातून तो आनंद मिळवण्याचा प्रयत्न करतात. त्यात गैर काहीच नाही. परंतू या बाबत भारतीय समाजात बोलणं आणि चर्चा करणं वर्ज मानलं जातं.


पूर्वीचे लोक लहान वयातच लग्न करायचे, त्यामुळे जोडीदाराशी सहज संबध प्रस्तापित होत असत. आज मात्र परिस्थिती खूप बदलली आहे. आजच्या पिढीने आपले प्राधान्यक्रम आधीच ठरवले आहेत. आज आपलं लक्ष आयुष्य आणि करिअर घडवण्यावर आहे, त्यानंतर आपण लग्नाचा विचार करतो. आज 30-40 वर्षांच्या वयात लोक लग्न करतात आणि म्हणूनच लग्नापूर्वी लैंगिक इच्छा निर्माण होणं नैसर्गिक बाब आहे. त्यासाठी सुरक्षित मास्टरबेशनचा उपयोग महिला आणि पुरूष दोघांकडून केला जातो. 


पॉर्न पाहणं आरोग्यासाठी धोक्याचं?


लैंगिक इच्छा नैसर्गिक असल्या तरी अति पॉर्न पाहणं न पुरूषांसाठी चागलं आहे न महिलांसाठी... जास्त पॉर्न पाहिल्याने तसेच पुन्हा पुन्हा मास्टरबेशन केल्याने महिला आणि पुरूष दोघांमध्ये सेक्सुअल डिस्फंक्शन होऊ शकतं.  इंटरनॅशनल जर्नल ऑफ हेल्थ सायंसेजच्यामधील एका शोध निबंधानुसार अति पॉर्न पाहिल्याने व्यक्तींच्या वागण्यात तसेच परस्पर नात्यांवर परिणाम होऊ शकतो. 


आज काल 4जी इंटरनेटमुळे पॉर्न व्हिडीओ सहज पाहता येतात. त्यामुळे पॉर्न पाहणाऱ्यांच्या संख्येतही कमालीची वाढ झाली आहे. ही प्रत्येकाची खासगी बाब आहे. परंतू कोणत्याही गोष्टीचा अतिरेक घातक ठरतो. म्हणून पॉर्न पाहण्याचाही अतिरेक करू नये.


(disclaimer हा लेख सामान्य माहितीच्या आधारावर आहे. अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या)