World AIDS Day 2022 : संपूर्ण जगात वैद्यकिय क्षेत्रात कितीही प्रगती झाली असली, जग कितीही पुढे गेलं असलं तरीही काही गोष्टींवर विज्ञानालाही तोडगा मिळालेला नाही. HIV चा संसर्ग हे त्याचंचच एक उदाहरण. आज 1 डिसेंबर; जागतिक एड्स दिन. HIV म्हणजे ह्यूमन इम्युनोडिफेशिएंसी वायरस. ज्यामध्ये हा विषाणू शरीरातील रोगप्रतिकारक शक्तीवर (Immunity system) हल्ला करतो आणि तिला इतकी कमकुवत करतो की शरीर इतर कोणतंही आजारपण पेलवूच शकत नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

HIV वर योग्य वेळी उपचार (treatment on hiv) न झाल्यास पुढे जाऊन AIDS सारखा गंभीर आजार होण्याची शक्यता असते. आजही या आजारावर कोणताही कायमस्वरुपी तोडगा मिळालेला नाही. पण, काही औषधोपचारांच्या आधारे या विषाणूची तीव्रता मात्र कमी करण्यात येते. ज्यामुळं रोगप्रतिकारक शक्ती तुलनेनं चांगल्या पद्धतीनं शरीराची साथ देते. 


पहिल्यांदाच HIV ची माहिती कशी मिळाली? 


1981 मध्ये HIV ची माहिती मिळाली होती. पण, भारतात याचा पहिला रुग्ण 1986 मध्ये सापडला. त्यावेळी चेन्नईमधील (Chennai) काही देहविक्री करणाऱ्या महिलांमध्ये या विषाणूचा संसर्ग झाल्याची माहिती समोर आली होती. तेव्हापर्यंत जगातील अनेक देशांमध्ये हा विषाणू पोहोचला होता. HIV च्या संसर्गामध्ये भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. 


हेसुद्धा वाचा : Measles : गोवरचा कोरोनापेक्षा पाचपट वेगानं फैलाव?


 


माहिती अधिकाराअंतर्गत समोर आलेल्या काही संदर्भांनुसार गेल्या 10 वर्षांमध्ये 17 लाखांहून अधिक जणांना (physical relationship) असुरक्षित शारीरिक संबंधांमुळं HIV नं गाठलं होतं. नॅशनल एड्स कंट्रोल ऑर्गनायजेशन (NACO) च्या माहितीनुसार 2011 पासून 2021 पर्यंच तब्बल 15782 जणांना रक्तावाटे हा संसर्ग झाला होता. 4,423 लहान मुलंही या संसर्गाच्या विळख्यात आली होती. 


काय आहेत HIV संसर्गाची कारणं? (Resons of HIV Transmission)


असुरक्षित शारीरिक संबंध हे एचआयव्हीच्या संसर्गाचं मुख्य कारण आहे. अनेक प्रकरणांमध्ये संक्रमित रक्ताच्या संपर्कात आल्यामुळंही हा आजार होऊ शकतो. तर, लहान मुलांमध्ये हा आजार त्यांच्या आईकडून आलेला असतो. जवळपास 4 दशकांहून अधिक काळापासून या आजाराती संपूर्ण जगात दहशत पाहायला मिळाली आहे. पण, अजूनही त्याच्यावर खात्रीदायक उपाय सापडलेला नाही. 


एचआयव्ही झालेल्या रुग्णांना अँटी रेट्रोव्हायरल थेरेपी  (ART) देण्यात येते, ज्यामुळं विषाणूची ताकद कमी होते. पण, काही प्रकरणांमध्ये असं न झाल्यास रुग्णाला एड्स होण्याचा धोका असतो. एचआयव्हीच्या संपर्कात आल्यानंतर अनेक वर्षांनी एड्सचा धोका संभवतो. 


आकडेवारी धास्तावणारी 
WHO अर्थात जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार दरवर्षी यामुळं अनेकांना हा संसर्ग विळख्यात घेच आहे. 2021 च्या अखेरीस जवळपास 3.84 कोटी जणांना या विषाणूची लागण झाली होती. तर, 6.5 लाख मृत्यू या संसर्गामुळे झाले होते. भारतात दर दिवशी सरासरी 115 मृत्यू या विषाणूच्या विळख्या आल्यानं होतात. सहसा एचआयव्हीचा एड्स होण्यामध्ये तीन टप्पे असतात. 


- पहिल्या टप्प्यामध्ये रक्तावाटे HIV चा संसर्ग होतो. इथं एका व्यक्तीपासून मोठ्या संख्येनं इतरांना संसर्ग होण्याचा धोका असतो. या टप्प्यावर तापासारखी लक्षणं दिसतात. अनेकदा काहींना ही लक्षणंही दिसत नाहीत. 


- दुसऱ्या टप्प्यामध्ये कोणतीही लक्षणं दिसली नाहीत तरी तो विषाणू मात्र सक्रिय असतो. अनेकदा 10 वर्षांहून अधिक काळही जातो, पण व्यक्तीला औषधांची गरज भासत नाही. पण, यादरम्यान सदरील व्यक्तीपासून संसर्ग पसरण्याचा धोका असतो. अखेर विषाणूची ताकद वाढून लक्षणं दिसण्यास सुरुवात होते. 


- HIV ची माहिती मिळताच औषधं सुरु केल्यास व्यक्ती तिसऱ्या टप्प्यापर्यंत पोहोचत नाही. हा अतिशय गंबीर टप्पा असतो. ज्यामध्ये व्यक्ती AIDS ग्रस्त होतो. उपचारांशिवाय या स्थितीत व्यक्ती तीन वर्षही जगणं कठीण असतं. 


या संसर्गापासून सं दूर रहावं? (Precautions to stay away from HIV)


असुरक्षित शारीरिक संबंध टाळून एचआयव्हीपासून दूर राहता येऊ शकतं. इंजेक्शनच्या माध्यमातून अंमली पदार्थ घेणाऱ्यांपासूनही दूर राहा. एचआयव्हीची माहिती मिळताच तातडीनं ART ची प्रक्रिया सुरु करा. कारण या विषाणूनं गाठताच इतरही आजार बळावण्याची शक्यता असते. या संसर्गावर कायमस्वरुपी तोडगा नसला तरीही औषधांच्या माध्यमातून त्यापासून सहज सुरक्षित राहता येतं. 


(वरील माहिती सामान्य संदर्भांच्या आधारे देण्यात आली आहे. गरज वाटल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)