मुंबई : देशात 60 वर्षांवरील 53 लाखांपेक्षा अधिक भारतीय अल्झायमर्सशी सामना करत आहेत. दर 27 नागरिकांमागे 1 जण अल्झायमर्सने त्रस्त असल्याची माहिती समोर आली आहे. अल्झायमर्स झालेल्यांना वर्तन बदल, विस्मृती अशा समस्यांशी सामना करावा लागतो. धक्कादायक बाब म्हणजे रुग्णाची काळजी घेण्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळाचा अभाव आहे. 2030 पर्यंत सुमारे 20 लाखांची वाढ होण्याचा अंदाज आहे. आज जागतिक अल्झायमर्स जनजागृती दिवस असल्याने अल्झायमर्स अ‍ॅण्ड रिलेटेड डिसऑर्डर सोसायटी ऑफ इंडिया’ या संघटनेने ही आकडेवारी जाहिर केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अल्झायमर्सची लक्षणं काय आहेत आणि अशा रुग्णांची काय काळजी घ्यावी?