मुंबई : अस्थमा त्रास दुर्लक्षित केल्यास तो अधिकच गंभीर रूप धारण करू शकतो. धाप  लागणं, थकवा जाणवणं हा त्रास अस्थमाच्या रूग्णांमध्ये हमखास आढळतो. अस्थमाचा अटॅक रूग्णांना कोणत्याही पूर्व लक्षणांशिवाय आणि अचानक कधीही येऊ शकतो. त्यामुळे त्याला आटोक्यात ठेवणं अधिक त्रासदायक ठरू शकतं मात्र काही घरगुती उपायांच्या मदतीने दम्याचा त्रास आटोक्यात ठेवणं सहजशक्य आहे. 


आवळा -


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

श्वसनाचे विकार आटोक्यात ठेवण्यासाठी आवळा फायदेशीर ठरतो. तीन टेबलस्पून आवळ्याचा रस चमाचाभर मधासोबत घेतल्यास अस्थमाचा त्रास आटोक्यात  राहतो. अस्थमाच्या रूग्णांनी दिवसाची सुरूवात या मिश्रणाने केल्यास नक्कीच  फायदा होऊ शकतो. 


लसूण - 


सुरूवातीच्या टप्प्यातील दम्याचा त्रास आटोक्यात ठेवणयसाठी लसूण फायदेशीर ठरते. लसणाच्या काही पाकळ्या ग्लासभर दूधात उकळूम प्यायल्यास हा त्रास आटोक्यात ठेवण्यास मदत होते.  नियमित किमान एक लसणाची पाकळी खाल्ल्याने पुरूषांना होतात हे '7' चमत्कारिक फायदे


आलं - 


श्वसनसंस्थेचे कार्य सुरळीत करण्यासाठी लसणाप्रमाणेच आलंदेखिल फायदेशीर ठरते. एक टीस्पून आल्याचा रस कपभर मेथी भिजवलेल्या पाण्यासोबत घेतल्यास फायदेशीर ठरते. यामध्ये मध मिसळून दिवसातून दोनदा हे मिश्रण प्यायल्यास आरोग्याला फायदा होतो.  


मध - 


श्वसनमार्ग मोकळा करण्यासाठी मध अत्यंत गुणकारी ठरते.  ग्लासभर गरम दूधामध्ये मध मिसळून दिवसातून दोनदा पिणे फायदेशीर ठरते. दूधासोबत चिमुटभर हळद उकळणंदेखील आरोग्याला फायदेशीर ठरू शकतं.दुधात मध मिसळून पिण्याचे फायदे


लिंबू -  


लिंबामध्ये मुबलक अ‍ॅन्टी बॅक्टेरियल घटक असतात. यामुळे श्वसनमार्ग मोकळा होतो. कफ बाहेर पडण्यास मदत होते. ग्लासभर गरम पाण्यात लिंबाचा रस मिसळल्यास हे मिश्रण अस्थमाच्या रूग्णांना फायदेशीर ठरू शकतं.