मुंबई : सध्याच्या काळात रक्तदान करणे गरजेचे झाले आहे. तसंच रक्तदान हे सर्वोकृष्ट दान मानले जाते. यामुळे इतरांना रक्ताचा फायद होतोच. पण त्याचबरोबर रक्तदान करणाऱ्यालाही याचे अनेक लाभ मिळतात. रक्तदानासंबंधित अनेक गैरसमज असल्याने रक्तदान करण्यास अनेक लोक नकार देतात. रक्तदान केल्याने अशक्तपणा येतो, म्हणून अनेकजण रक्तदान करणे टाळतात. पण रक्तदान केल्यानंतर २१ दिवसांनी रक्त पुन्हा तयार होते. पण रक्तदान करताना या काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

# रक्तदान करण्यापूर्वी रक्त दान करण्या योग्य आहे की नाही, हे तपासून घ्या.


# रक्तदान करण्याचा विचार करत असाल तर प्रथम स्मोकींग करणे टाळा. त्याचबरोबर रक्तदान केल्यानंतर ३ तासांनीच धुम्रपान करा.


# रक्तदान केल्यानंतर प्रत्येक तीन तासांनी हेव्ही डाएट घ्या. अधिकाधिक हेल्दी खाण्यावर भर द्या. फळे खाणे फायदेशीर ठरेल.


# रक्तदान केल्यानंतर ज्युस, चिप्स, फळं दिली जातात. ते घेणे टाळू नका.


# रक्तदान केल्यानंतर १२ तास हेव्ही एक्सरसाईज करु नका. 


# रक्तदान करण्यापूर्वी ४८ तास आधी मद्यपान करणे टाळा. ४८ तासादरम्यान मद्यपान केल्यास रक्तदान करु शकणार नाही. 


# रक्तदान केल्यानंतर तरल पदार्थांचे सेवन करा. त्यामुळे अशक्तपणा जाणवणार नाही.


महत्त्वाचे:


  • एका वेळेस कोणाच्याही शरीरातून 471एमल रक्त काढले जात नाही.

  • त्यामुळे रक्तदान केल्याने हिमोग्लोबीनची कमतरता भासेल, असे काही नाही.

  • कोणतीही हेल्दी व्यक्ती रक्तदान करु शकते. पुरुष ३ महिन्यातून एकदा आणि महिला ४ महिन्यातून एकदा रक्तदान करु शकतात.