Healthy Heart Juices: हृदय आपल्या शरीरातील फार महत्वाचा अवयव आहे. जन्म घेतल्यापासून ते मृत्यूपर्यंत हृदय धडधडत राहतं. त्यामुळे याची काळजी घेणंही फार गरजेचं आहे. त्यातच आज (29 सप्टेंबर) जागतिक हृदय दिन (World Heart Day) आहे. हा दिवस लोकांना हृदयाशी संबंधित आजारांबद्दल जागरूक करण्यासाठी साजरा केला जातो. (world heartd day drink five healthy juices for happy heart)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान जर हृदयाची काळजी घेतली नाही तर हार्ट अटॅक (Heart attack), कोरोनरी आर्टरी डिजीज आणि ट्रिपल वेसल डिजीजसारखे जीवघेणे आजार होऊ शकतात. त्यामुळे डेली डाएटमधून हृदयासाठी घातक पदार्थ बाहेर केले पाहिजे. तसेच काही महत्वाच्या फळांचा ज्यूस (Fruit juice) आहारात समावेश केला पाहिजे. यासाठी कोणच्या पाच फळांचा ज्यूस पियाला पाहिजे याबाबत अधिक माहिती जाणून घ्या... 


टोमॅटोचा ज्यूस


टोमॅटोच्या रसामध्ये (Tomato juice) व्हिटॅमिन बी-3, ई आणि लाइकोपीन असते जे शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलची (Cholesterol) पातळी कमी करते. याव्यतिरिक्त, पोटॅशियम रक्तदाब कमी (Lower blood pressure) करते, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका ( heart attack) येण्याची शक्यता खूप कमी होते. 


डाळिंबाचा ज्यूस 


डाळिंबाचा रस (Pomegranate juice) तुमच्या हृदयासाठी फायदेशीर आहे. हे रक्त प्रवाह सुधारण्यास मदत करते आणि रक्तवाहिन्या (Blood vessels) घट्ट होण्यास प्रतिबंध करते. हा रस नियमित प्यायल्याने रक्तवाहिन्यांमध्ये प्लेक आणि कोलेस्टेरॉलचा विकास रोखण्यास मदत होते.


संत्र्याचा ज्यूस
 
संत्र्याच्या (Orange juice) सालीत असलेल्या अल्कालॉइड सिनेफ्रीन नावाच्या घटकामुळे लिव्हर एलडीएल म्हणजेच अनावश्यक कॉलेस्टरॉलची अधिक निर्मिती होत नाही. निरोगी हृदयासाठी संत्रे खूप आवश्यक आहे. 


वाचा :  Bank खातेदारकांना मिळणार cash withdrawal ची नवीन सुविधा, कसं ते पाहा


 नारळाचे पाणी


नारळ पाण्यात (Coconut water) इलेक्ट्रोलाइट्स आणि पोटॅशियम असते, जे हृदयाची काळजी घेण्यासाठी उपयुक्त ठरते. यातील जीवनसत्त्वे आणि खनिजे हृदय निरोगी ठेवण्यास मदत करतात. जर तुम्हाला तुमचे हृदय निरोगी ठेवायचे असेल तर रोज रात्री झोपण्यापूर्वी नारळ पाणी प्या. 


व्हेजिटेबल ज्यूस 


 पालक, केल आणि कोलार्ड या हिरव्या पालेभाज्यांमध्ये (Vegetable juice) भरपूर जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटीऑक्सिडंट असतात जे हृदय निरोगी ठेवतात. या भाज्यांमध्ये भरपूर जीवनसत्त्वे असतात जी हृदयाच्या धमन्यांचे संरक्षण करतात आणि रक्त गोठण्यास प्रतिबंध करतात.