Bank खातेदारकांना मिळणार cash withdrawal ची नवीन सुविधा, कसं ते पाहा

Airtel Payments Bank : बँक अधिक बँकिंग क्षेत्रे पद्धतशीरपणे कव्हर करण्यासाठी हळूहळू आपल्या सेवेचा विस्तार करेल.

Updated: Sep 29, 2022, 11:39 AM IST
Bank खातेदारकांना मिळणार cash withdrawal ची नवीन सुविधा, कसं ते पाहा title=

Micro ATM: ग्राहकांच्या सोयी लक्षात घेऊन एअरटेल पेमेंट्स बँकेच्या वतीने मायक्रो एटीएम उभारण्याचे काम सुरू केले. यामुळे देशातील मेट्रो आणि टियर वन शहरांबाहेर राहणाऱ्या डेबिट कार्ड युजर्सना रोख पैसे काढण्याची चांगली सुविधा मिळणार आहे. (airtel payments bank to install micro atms )  

या योजनेमुळे युजर्सना रोख पैसे काढण्याची सुविधा देण्यासाठी भारतातील 500,000 पेक्षा जास्त बँकिंग पॉईंट्सच्या नेटवर्कचा लाभ घेतला जाईल. मायक्रो एटीएमद्वारे ट्रांजक्शनची सुविधा देण्यासाठी एअरटेल पेमेंट्स बँक आता नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) आणि नॅशनल फायनान्शिअल स्विच (NFS) सह इंटिग्रेटेड करण्यात आली आहे. 

कोणत्याही बँकेशी संबंधित ग्राहक एअरटेल पेमेंट्स बँकेच्या बँकिंग पॉईंटवर मायक्रो एटीएम सुविधा वापरू शकतील. एक ग्राहक मायक्रो एटीएमद्वारे प्रत्येक व्यवहारासाठी 10,000 रुपये काढू शकतो, असे कंपनीने सांगितले. तसेच, मायक्रो एटीएम टप्प्याटप्प्याने सुरू केले जातील. सुरुवातीला बँक टियर II शहरे आणि अर्ध-शहरी भागात 150,000 युनिट्स उभारणार आहे.

वाचा : vegetables rates hike : आज 'या' भाज्यांचे दर वाढले; वाचा बाजारभाव

या भागात साधारणपणे रोख पैसे काढण्याच्या सेवेची मागणी जास्त असते परंतु एटीएमची संख्या मर्यादित असते, असे एअरटेल पेमेंट्स बँकेने सांगितले. 

मार्चपर्यंत 1.5 लाख मायक्रो एटीएम बसवले जातील

या उपक्रमाद्वारे, बँक वापरकर्त्यांना सहज रोख पैसे काढण्याची सुविधा देण्यासाठी देशभरातील पाच लाखांहून अधिक बँकिंग पॉइंट्सच्या मजबूत नेटवर्कचा लाभ घेईल. चालू आर्थिक वर्षाच्या अखेरीस 1.5 लाख मायक्रो एटीएम बसवण्याची कंपनीची योजना आहे. म्हणजेच मार्चपर्यंतच्या सहा महिन्यांत दीड लाख एटीएम घाईघाईने बसवण्यात येणार आहेत.

मायक्रो एटीएम म्हणजे काय?

मायक्रो एटीएम हे कार्ड स्वाइप मशीनसारखे दिसणारे छोटे मशीन आहे. हे मशीन आवश्यक बँकिंग सुविधा प्रदान करण्यास सक्षम आहे. अशी एटीएम खूप फायदेशीर आहेत, येथे अशा लोकांना सुविधा दिली जाते जिथे सामान्य एटीएम सुरू होऊ शकत नाही.