World Kindness Day: अनेक आजारांपासून दूर ठेवतो दयाळू स्वभाव, जाणून घ्या `या` दिनाचं महत्त्व
आज 13 नोव्हेंबर रोजी जगभरात World Kindness Day साजरा केला जातो.
World Kindness Day 2022: जागतिक दयाळू दिन (World Kindness Day) हा 1998 सालापासून संपूर्ण जगभरात साजरा केला जातो. या दिनाची संकल्पना जागतिक दयाळू चळवळीतून निर्माण झाली. यामध्ये ऑस्ट्रेलिया, थायलंड, अमेरिका, इंग्लंड यांसारख्या देशांचा पुढाकार होता. सर्व लोकांनी एकत्र यावे, माणुसकी जपावी, हिंसात्मक कृत्यांना आळा बसावा अशा उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो. 13 नोव्हेंबर रोजी जगभरात World Kindness Day साजरा केला जातो.
सध्याच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येक व्यक्ती आपापल्या कामात व्यस्त असतो. आपण आपल्या जगात इतके हरवलेले असतो की आपल्या आजूबाजूला काय चालू आहे याची देखील कल्पना नसते. अनेकांना विविध प्रकारचे ताणतणाव असतात. त्यामुळे चिडचिडपणाची वृत्ती वाढत आहे. माणूस टेंशनमध्ये (tension) असला की एकाचा राग दुसऱ्यावर काढतो. त्यामुळे जवळचे व्यक्ती सुद्धा विनाकारण दुखावले जातात. त्यामुळे विनाकारण नकारात्मकरता आपल्यामध्ये निर्माण होत राहते.
वाचा : तुमच्या शहरात आज पेट्रोल-डिझेलचे दर काय? जाणून घ्या
दरम्यान दयाळूपणा किंवा kindness आरोग्यसंपन्न आयुष्य जगण्यासाठी मदत करतो. दयाळूपणा आनंदी राहण्याव्यतिरिक्त मन शांत ठेवण्यातही मदत करतो. त्यामुळे एखाद्याची मदत करणं, दान करणं, लोकांची सेवा करणं या सर्व गोष्टी या भावना व्यक्त करण्याचा एक मार्ग आहे. सोशल एन्क्झायटी (Social anxiety) अनेकांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम करत असते. मानसिक आरोग्याचा थेट संबंध हा शारीरिक आरोग्याशी येत असतो. अशा प्रकारची सोशल एन्क्झायटीची समस्या आपल्या आयुष्य जगण्याच्या गुणवत्तेवर परिणाम करते.
दयाळू भाव ठेवणाऱ्यांचा सोशल एन्क्झायटीपासून सहजपणे बचाव होत असल्याचं, अनेक अभ्यासातून आणि संशोधनातून सांगण्यात आलं आहे. या भावनेमुळे मन शांत राहतं. बैचेन, अस्वस्थता कमी होत असल्याने तणाव, उच्च रक्तदाब यांसारख्या समस्यांपासूनही व्यक्ती लांब राहू शकतात. तसेच शरीरावर येणारी सूजही अनेक आजारांशी संबंधीत असते. मधुमेह, कर्करोग, क्रोनिक पेन (तीव्र वेदना), लठ्ठपणा, मायग्रेन या आजारांचं एक कारण ही सूजदेखील आहे. ऑक्सिटॉसिन हार्मोन्स ही सूज कमी करतात. दयाळूपणा किंवा दया भाव शरीरात हे अतिमहत्त्वाचे ऑक्सिटॉसिन हार्मोन्स (Oxytocin hormones) निर्माण करतात
दयाळूपणा जपताना हे नक्की करा
1) सर्वात आधी स्वतः दयाळूपणा आत्मसात करा.
2) स्वतःसह इतरांसोबत दयाळूपणाने वागा.
3) प्राण्यांसाठी मनात दया ठेवा.
4) जे लोक तुमची काळजी करताना त्यांच्याशी आपुलकीने वागा
5) अडचणीत असलेल्या लोकांना मदत करा.
वाचा : t20 world cup final च्या चाहत्यांसाठी वाईट बातमी!
स्वत:मधील दयाळूपणा असा जपा
1) चेहऱ्यावर नेहमी हलकं स्मित असावे
2) प्रत्येक व्यक्तींप्रती मनात नेहमी आदराची भावना ठेवा. कोणालाही कमी लेखू नका.
3) आपण काय बोलतो यावर नियंत्रण ठेवा. बोलताना आपले बोलणे मृदू असावे.
4) समोरच्याचे म्हणणे ऐकूण घ्या. दुसरी बाजु समजून घेण्याचा प्रयत्न करा.
5) रागावर नियंत्रण असू द्या. विनाकारण चिडचिड होऊ देवू नका. शांत रहा.
6) ताणतणाव आल्यास आपल्या आवडता छंद जोपासावा.
7) एखादी व्यक्ती आपल्यावर चिडली असेल तर, त्या व्यक्तीला स्मितहास्य ठेवून सॉरी म्हणा.