Pakistan vs England अंतिम सामना रद्द! चाहत्यांची हिरमोड होणार?

T20 World Cup 2022 Final: टी-20 वर्ल्डकपवर नाव कोरण्यासाठी पाकिस्तान आणि इंग्लंडमध्ये आज (13 नोव्हेंबर) महामुकाबला होणार आहे. दुसऱ्यांदा विश्वचषक उंचावण्यासाठी दोन्ही संघ सज्ज.  

Updated: Nov 13, 2022, 08:37 AM IST
Pakistan vs England अंतिम सामना रद्द! चाहत्यांची हिरमोड होणार?  title=
T20 World Cup 2022 Final, PAK vs ENG

T20 World Cup 2022 Final, PAK vs ENG:  T-20 विश्वचषकाचा अंतिम सामना रविवारी, 13 नोव्हेंबर रोजी पाकिस्तान आणि इंग्लंड (Pak-Eng) यांच्यात मेलबर्नमध्ये खेळवला जाणार आहे, परंतु या सामन्यावर पावसाचा धोका निर्माण झाला आहे. ऑस्ट्रेलियन हवामान अंदाज (Australian weather forecast) विभागानुसार, रविवारी मेलबर्नमध्ये 100% आणि रिझर्व्ह डेला म्हणजे सोमवारी 95% पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. तर वाऱ्याचा वेग ताशी 35 किलोमीटरपेक्षा जास्त असू शकतो. परिणामी Pak- Eng चा सामना रद्द होण्याची शक्यता जास्त प्रमाणात आहे.  

मात्र, दोन्ही दिवशी पावसाचा अंदाज खरा ठरल्याने अंतिम फेरी रद्द करण्यात आले तर इंग्लंड-पाकिस्तानला ट्रॉफी शेअर करावी लागणार आहे. दुसऱ्या शब्दांत, पाकिस्तान आणि इंग्लंड यांना संयुक्त विजेता घोषित केले जाईल.   

राखीव दिवशीही अंतिम सामना होणे अशक्य

आज (13 नोव्हेंबर) मेलबर्नमध्ये कमाल तापमान (temperature in Melbourne) 26  अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 15 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. तर 82% ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. येथे वाऱ्याचा वेग 37 किमी/ताशी असेल. तसे, अंतिम सामन्यासाठी राखीव दिवसही ठेवण्यात आला आहे. म्हणजेच आज सामना झाला नाही तर तो उद्या (14 नोव्हेंबर) पूर्ण होईल. मात्र त्या दिवशीही 94 टक्के पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अशा परिस्थितीत हा सामना पूर्णपणे रद्द होण्याची शक्यता आहे.

मेलबर्नमधील रविवारचा हवामान अंदाज

कमाल तापमान: 26 °C
किमान तापमान: 15 ° से
पावसाची शक्यता: 84%
ढगाळ हवामान: 82%
वाऱ्याचा वेग असेल: 37 किमी/ता

मेलबर्नमधील सोमवारचा हवामान अंदाज

कमाल तापमान: 19 ° से
किमान तापमान: 7 ° से
पावसाची शक्यता: 94%
ढगाळ: 85%
वाऱ्याचा वेग असेल: 59 किमी/ता

वाचा : तुमच्या शहरात आज पेट्रोल-डिझेलचे दर काय? जाणून घ्या  

कोणताही संघ जिंकला तरी त्यांचे दोन्ही संघ विजयी

या अंतिम सामन्यात विजेतेपद कोणताही संघ जिंकेल, त्याचे हे दुसरे T20 विश्वचषक विजेतेपद असेल. याआधी 2009 आणि त्यानंतर लगेचच 2010 मध्ये पाकिस्तानने टी-20 विश्वचषक जिंकला होता. यावेळी इंग्लंडचा संघ फेव्हरेट मानला जात आहे. पण पाकिस्तानही कमकुवत संघ नाही. इंग्लंडने उपांत्य फेरीत टीम इंडियाचा पराभव केला. तर पाकिस्तानने न्यूझीलंडचा पराभव केला.

T20 विश्वचषकासाठी पाकिस्तान-इंग्लंडचा पूर्ण संघ

पाकिस्तान संघ: बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, आसिफ अली, हैदर अली, हरिस रौफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद हसनैन, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, मोहम्मद वसीम जूनियर, नसीम शाह, शाहीन शाह आफ्रिदी, शान मसूद , मोहम्मद हरीस.

ट्रॅव्हलिंग रिझर्व्हः उस्मान कादिर आणि शाहनवाज दहनी.

इंग्लंड संघ: जोस बटलर (कर्णधार), मोईन अली, अॅलेक्स हेल्स, हॅरी ब्रूक, सॅम करन, ख्रिस जॉर्डन, लियाम लिव्हिंगस्टोन, डेविड मलान, आदिल रशीद, फिल सॉल्ट, बेन स्टोक्स, टायमल मिल्स, डेव्हिड विली, ख्रिस वोक्स आणि मार्क वुड .

राखीव खेळाडू: लियाम डॉसन आणि रिचर्ड ग्लीसन.