या `5` घरगुती उपायांनी हिरड्यातून रक्त येण्याच्या समस्येवर मिळवा ताबा
Gingivitis म्हणजेच हिरड्यांना आलेली सूज हा त्रास वेदनादायी असतो.
मुंबई : Gingivitis म्हणजेच हिरड्यांना आलेली सूज हा त्रास वेदनादायी असतो.
हिरड्यांवर प्लाक जमा झाल्याने दातांप्रमाणेच हिरड्यांचेही नुकसान होते. बॅक्टेरियल इंफेक्शनमुळे हिरड्यांमधून रक्त येणं, चावताना वेदना जाणवणं, हिरड्यांवर सूज येणं, दात कमजोर होणं, तोंडाला दुर्गंधी येणं असा त्रास जाणवतो.
Gingivitis चे डेन्टीस्टकडून निदान झाल्यानंतर अॅन्टीबायोटिक्स, माऊथवॉश सुचवला जातो. तर काहींना शस्त्रक्रियेची मदत घ्यावी लागते. म्हणूनच या समस्येवर उपाय म्हणून इंफेक्शन कमी करण्यासाठी या घरगुती उपायांची मदत घ्या.
1. डाळिंब
डाळींबामध्ये अनेक अॅन्टीबॅक्टेरियल गुणधर्म आहेत. हे काही अभ्यासातून सामोरी आले आहे. त्यामुळे दातांवरील प्लाग आणि तोंडाचे आरोग्य जपण्यासाठी डाळींब फायदेशीर ठरते. journal Ancient Science of Life in 2013 च्या अहवालानुसार, सुमारे 30 मिली डाळींबाच्या रसाने दिवसभरात काही मिनिटे चूळ भरल्यास दातांवरील प्लाग आणि बॅक्टेरियल इंफेक्शन कमी करण्यास मदत होते. घरच्या घरी हा रस बनवताना त्यामध्ये साखर मिसळू नका.
2. ऑईल पुलिंग
हा एक आयुर्वेदीक उपाय आहे. खोबरेल तेल gingivitis चा त्रास कमी करण्यास फायदेशीर ठरते. यामुळे प्लाक तसेच तोंडाची दुर्गंधी कमी करण्यास फायदेशीर ठरते.
3. कोरफड
कोरफडीमध्ये थंडावा निर्माण करण्याची क्षमता असते. त्यामुळे केसांच्या आणि त्वचेच्या सौंदर्यासाठी त्याचा वापर केला जातो. तसेच gingivitis चा त्रास कमी करण्यासाठीही कोरफड फायदेशीर ठरते. याकरिता कोरफडीच्या माऊथवॉशने दिवसातून दोनदा तोंड स्वच्छ करावे. यामुळे हिरड्या मजबूत होण्यास मदत होते.याकरिता कपभर distilled water (डिस्टिल्ड वॉटर) मध्ये दोन टीस्पून बेकिंग सोडाआणि कोरफडाचा गर मिसळा. या मिश्रणापासून माऊथवॉश बनवा. दुर्गंधी कमी करण्यासाठी तुम्ही पेपरमिंटचा वापर करू शकता.
4. मध
Gingivitis वर उपचार पूर्ण झाल्यानंतर हा त्रास पुन्हा उलटू नये म्हणून त्याभागावर मध लावावे. मधामध्ये अॅन्टीबॅक्टेरियल गुणधर्म असतात. त्यामुळे हा घरगुती उपाय फायदेशीर ठरतो.
5. कडूलिंब
Journal of Indian Society of Periodontology च्या अभ्यासानुसार, कडूलिंबाच्या पाण्याने तोंड स्वच्छ केल्याने नैसर्गिकरित्या gingivitis चा त्रास कमी करण्यासाठी मदत होते. इतर उपायांपेक्षा कडूलिंबाचे माऊथवॉशचे दुष्परिणाम कमी होतात.
6. मीठाचं पाणी
मीठ-पाण्याचे गरम मिश्रण हिरड्यातून रक्त येणं, दातदुखीची समस्या कमी करण्यास फायदेशीर ठरते. या पाण्याने दिवसातून दोन ते तीन वेळेस चूळ भरल्याने त्रास कमी होण्यास मदत होते.