World Sleep Day 2023 : शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी (physically and mentally fit)  शांत झोप ही खूप महत्त्वाची आहे. गेल्या काही वर्षांपासून बदलेली जीवनशैली, कामाचा वाढता ताण, शिफ्टनुसार ऑफिसचं टाइमिंग यामुळे हजारो लोकांची झोप (Sleep) पूर्ण होतं नाही. त्यात खाण्यापिण्याचा विचित्र सवयीमुळे अनेकांना शांत झोप  (health problems) लागतं नाही. याचा परिणाम त्यांचा आरोग्यावर दिसून येतो. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल पण कमी झोपेमुळेही तुमचं वजन वाढतं, असं तज्ज्ञांचं मत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज 17 मार्च म्हणजे वर्ल्ड स्लिप डे (#WorldSleepDay) आहे. त्यानिमित्ताने आपण कुठल्या वयात किती झोप (Sleep According To Age) महत्त्वाची आहे, कमी झोपेमुळे शरीरावर (tips for good sleep) होणार परिणाम शिवाय जास्त झोपही तुमच्या आरोग्यास धोकादायक ठरु शकते. यासगळ्याबद्दल जाणून घेणार आहोत. (world sleep day 2023 Sleep According To Age Benefits of sleep tips for good sleep 8 hours sleep sleeping dangerous trending news in marathi )



वयानुसार किती तासांची झोप घेणं गरजेचं? (Relation Between Sleeping Hours And Age)


नवजात मुलांसाठी 


1 ते 4 आठवड्यांच्या बाळाला दिवसातून 15 ते 17 तासांची झोप
1 ते 4 महिन्यांच्या बाळाला 14 ते 15 तासांची झोप
4 महिने ते 12 महिन्यांच्या बाळाला 13 ते 14 तासांची झोप


एक वर्षाहून अधिक


1 ते 3 वर्षांच्या मुलास 12 ते 13 तासांची झोप
3 ते 6 वर्षांच्या मुलासाठी 10 ते 12 तासांची झोप 
6 वर्षे आणि त्याहून अधिक वयोगटासाठी


6 ते 12 वर्षांच्या मुलाने दररोज सुमारे 9 ते 10 तास झोप
12 ते 18 वयोगटातील मुलांनी दररोज 8 ते 10 तासांची झोप
18 वर्षांवरील सर्व लोकांनी दररोज 7 ते 8 तास झोप 
मध्यम वयात- 8 तास
वृद्ध - 8 तास 


पुरेशी झोप घेतली नाही तर अशावेळी तुमचा चेहऱ्याल जास्त वयाचं लक्षण दिसतं. शिवाय वजन वाढणं (weight gain), कोलेस्ट्रॉल (Cholesterol), हार्ट अटॅक (Heart attacks), ब्लड प्रेशर आणि डोळ्यांसंबंधित समस्या उद्भवू शकतात. अमेरिकन हार्ट असोसिएशन(AHA) ने कमी झोप हे हार्ट संबंधित समस्यांना सामोरं जावं लागत असल्याचं म्हटलंय. 


झोपेचे फायदे (Benefits of sleep)


वयानुसार पुरेशी झोप घेतल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते
मेंदू सुरळीत काम करतो
हृदय निरोगी राहते आणि किडनी, यकृताच्या समस्याही दूर राहतात.
स्नायूंचा ताण दूर करण्यासाठी आणि पेशींची दुरुस्ती करण्यासाठी झोप आवश्यक
कार्यक्षमता आणि भावनिक शक्ती वाढवण्यासाठी झोप आवश्यक 
शिकण्याची क्षमता वाढवण्यासाठी पुरेशी झोप आवश्यक 


8 तासांपेक्षा जास्त झोपही तुमच्यासाठी धोकादायक?


तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, ''कमीत कमी 7 झोप न घेणाऱ्या लोकांमध्ये गेल्या 10 वर्षांमध्ये हार्ट अटॅकचा धोका वाढला होता. त्यामुळे 7 तासांपेक्षा जास्त झोप घेणे आवश्यक आहे. मात्र याचा अर्थ असा नाही की, 8 तासांपेक्षा जास्त झोपलं पाहिजे.'' 8 तासांपेक्षा जास्त झोपणे हेदेखील आजारपणाचं लक्षण आहेत. 


निद्रानाशपासून दूर राहण्यासाठी 'या' गोष्टी लक्षात ठेवा!


चहा आणि कॉफी या पेयांमध्ये आढळणाऱ्या कॅफिन या उत्तेजक घटकामुळे तुमची झोप उडते. त्यामुळे चहा आणि कॉफीचं सेवन टाळावं. 


रात्री हलका आहार घ्या आणि तिखट तसंच मसालेदार पदार्थ देखील टाळा. कारण पित्त आणि अपचनाचा त्रास झाल्यास तुमची झोप बिघडू शकते. 


काही लोकं सकाळी व्यायाम करण्याऐवजी संध्याकाळी उशीरा व्यायाम करतात. यामुळे निद्रानाशाचा त्रास अधिक शक्यता आहे. झोपण्याचा 4 तासांपूर्वी व्यायाम करावा.