मुंबई : विटिलिगो म्हणजेच पांढरे  कोड, हा त्वचेशीसंबंधी विकार आहे, पांढरे डाग हे संसर्गजन्य नाहीत. म्हणजे पांढरे डाग एका व्यक्तीच्या स्पर्शाने दुसऱ्या व्यक्तीकडे पसरत नाहीत. तसेच आपल्या आहाराशी देखील काहीही संबंध नाही. हा एक ऑटो-इम्यूनो डिसऑर्डर आहे, ज्यात शरिरातील रोग प्रतिरोधक क्षमता शरिरालाच त्रास देण्यास सुरूवात करतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यात त्वचेचा रंग बनवणारे सेल्स म्हणजेच Melanocyte कमी होतात किंवा काम करण्याचे बंद करतात, ज्यामुळे शरीरावर पांढरे डाग होतात. ही समस्या मोठ्या प्रमाणात ओठांजवळ आणि हातावर, हात-पाय-चेहरा, शरिराच्या वेगवेगळ्या जागेवर होतात. 


यामुळे लोक स्वत: ला दुसऱ्यांपेक्षा वेगळे समजू लागतात. काही लोकांना वाटते की, यावर उपचार नाही, परंतू असे अजिबात नाही. याच्यावर उपचार होऊ शकतो, फक्त काही गोष्टींवर लक्ष ठेवावे लागते. 


महत्वाचे म्हणजे ज्या लोकांना पांढरे डाग आहेत, त्यांनी घटट् कपडे आणि रबर-केमिकल्स पासून लांब रहावे, असे न केल्यास पांढरे डाग वाढण्याची शक्यता असते. मात्र पांढरे डाग त्वचेवर पडण्यास रबर केमिकल्स हे एकमेव कारण नाही.


खूप लोकांना वाटते की पांढऱ्या डागावर उपचार होऊ शकत नाहीत. ही गंभीर समस्या नाही. परंतू याचा रूग्णाच्या जीवनावर प्रचंड प्रभाव पडतो आणि त्यामुळे त्यांना तणाव वाढतो.


यावर मॅक्स पेपेगनचे त्वचा चिकित्सक डॉ. मुकेश गिरधर म्हणाले की, चुकीचे समज आहेत, ज्यामुळे लोक डिप्रेशनमध्ये जातात. त्यात सगळ्यात मोठा चुकीचा समज म्हणजे आंबट वस्तू खाऊ नये, आणि मासे खाल्यानंतर दूध पिऊ नये. अशी कारणं चुकीचे आहेत. 


मुळात विटिलिगो आहाराशी संबंधित नाही. तो इम्यून सिंड्रोम आहे, ज्यामुळे पांढरे डाग होण्यास सुरूवात होते. लोकांना विटीलोग कसा होतो हे माहित नाही. लोकसंख्येचा एकूण दीड टक्के लोकांना पांढरे डाग होतात. पण घाबरण्याची गरज नाही, फक्त काही गोष्टींवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे.   


'पांढरा कोडा'वर उपचार


डॉ. गिरधर म्हणतात की, नेहमी डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे औषध घ्या, कारण तसं न केल्यास, त्यांचे दुष्परिणाम होतात. मात्र सांगितल्याप्रमाणे औषधं घेतल्यास, फायदा होईल, 
 
यावर नॅरोबॅंन्ड अल्ट्रावायलट पद्धतीने उपचार केला जाऊ शकतो आणि हा उपाय सगळ्यात प्रसिध्द आहे. गर्भवती महिलेवर ही याच पध्दतीने उपचार केला जातो. शस्त्रक्रियेत मिलेनोसाइट ट्रांसफरने सुध्दा उपचार करू शकतो. हे दोन्ही उपाय खूप प्रभावी आहेत.