मुंबई : चुकीच्या खाण्याच्या सवयी आणि धूम्रपान तसंच तंबाखूसारख्या वाईट सवयींमुळे दातांचं आरोग्य धोक्यात येतं. यामुळे तुमच्या दातांचा रंग पिवळा होतो. पिवळे दात आपल्या हास्याचा प्रभाव कमी करतं. मात्र झोपण्यापूर्वी काही गोष्टी केल्यामुळे तुमचे दात पांढरे होण्यास मदत होईल. जाणून घ्या दातांना पांढरं करण्याचे काही उपाय


केळ्याचं साल


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रोज रात्री झोपायच्या आधी केळ्याच्या सालीचा आतला भाग दातांवर 2-3 मिनिटं घासावं. त्यानंतर कोमट पाण्याने दात धुवा. केळीच्या सालीमध्ये असलेलं मिनरल्स आणि पोटॅशियम दातांमधील घाण साफ करतात. केळीची साल जास्त जोराने घासू नका, यामुळे हिरड्यांमध्ये वेदना होऊ शकते.


बेकिंग सोडा आणि लिंबू


दात स्वच्छ करण्यासाठी 1 चमचा बेकिंग सोड्या मध्ये 1 चमचा लिंबाचा रस मिसळून 2 ते 3 मिनिटं दातांवर लावा. त्यानंतर स्वच्छ पाण्याने स्वच्छ धुवा आणि झोपा. आठवड्यातून दोन ते तीन रात्री दात स्वच्छ करण्यासाठी हा घरगुती उपाय करा. बेकिंग सोडा आणि लिंबाचा रस दातांवरील डाग साफ करू शकतो.


हळद


रोज रात्री झोपायच्या आधी हळद पावडरने ब्रश करा. 2 ते 3 मिनिटांनी माऊथवॉश करा. दातांमधून पिवळेपणा दूर करण्यासाठी ही पद्धत अगदी सोपी आहे.


नारळाचं तेल


नारळाचे तेल आपल्या बोटांवर घेऊन दररोज रा त्री दातांवर घासून घ्या. दातांची घाण साफ करण्याचा हा एक प्रभावी मार्ग आहे. हे तेल पोटात जाणार नाही याकडे लक्ष द्या. 


कडुलिंब


दातांच्यामध्ये घाण आणि बॅक्टेरिया जमा होतात. हे दूर करण्यासाठी तुम्ही 4 ते 5 कडुलिंबाची पानं पाण्यात उकळून घ्या आणि याने तोंड स्वच्छ धुवा. त्यानंतर दात घासून घ्या. हे रोज रात्री केल्याने तुमच्या दातांचा रंग उजळण्यास मदत होईल.