मुंबई : दिवसभर कुणाला तोंड बंद करून बस म्हटलं तर ते अगदी अशक्यच आहे. पण 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जर एखादी व्यक्ती जवळपास 30 वर्ष तोंड बंद असेल तर... वाचून धक्का बसला ना. पण हे खरं आहे. आपलं तोंड दिवसभरातून आपण किती वेळा उघडत असू याचा कधीच विचार केला नसेल. पण जेव्हा हे तोंड आपण उघडू शकत नाही तेव्हा. 


तोंड न उघडणं हा आजार आहे का? 


अशी परिस्थिती घडली आहे 30 वर्षाच्या येमेन फातिमाची. जिने बहुदा गेल्या 30 वर्षात तोंड उघडलंच नाही. तिने शेवटच तोंड कधी उघडलं याची तिचा साधी आठवण देखील नाही. अनेक डॉक्टरांकडे उपचार करूनही तिने अखेर भारतात येण्याचा निर्णय घेतला. पुण्यात तिने यासाठी उपचार घेतला आहे. 


माय मेडिकल मंत्रशी बोलताना डॉक्टर म्हणाले की, 20 दिवसांपूर्वी फातिमा पुण्यातील हॉस्पिटलमध्ये आली. तिची तक्रार अशी होती की, तोंड उघडतच नाही, कान आणि नाक खूप दुखतं. फातिमाला हा त्रास अगदी लहानपणापासून आहे. त्यामुळे आपण शेवटचं तोंड कधी उघडलं याची जाणीव देखील त्यांना नाही. 


काय आहे ओस्टीओमा?


उपचारादरम्यान असं निदर्शनास आलं की, कानाजवळील सांध्याजवळ छोटा ट्युमर आहे. या ट्युमरमुळे सांध्यांचे स्नायू घट्ट झाल्यामुळे सांध्यांची हालचाल बंद झाली. या ट्युमरला ओस्टीओमा असं म्हणतात. फातिमाला काहीच गिळता येत नसल्याने ती खाऊ शकत नव्हती. फक्त पाणी आणि द्रव पदार्थांवर ती जगत होती. चार तासांच्या शस्त्रक्रियेनंतर तिच्या कानाजवळचा ट्युमर आम्ही काढून टाकला. फातिमाच्या सांध्याची आता योग्यपद्धतीने हालचाल होत असून तब्बल २९ वर्षांनंतर आता ती ५० मिलीमीटर तोंड उघडू शकते.”


“ओस्टिओमा’ टयुमर खूप दुर्मिळ आहे. कवटीत आढळून येणाऱ्या ट्युमरपैकी फक्त ०.१ ते १ टक्का हा ट्युमर आढळून येतो. हा ट्युमर कॅन्सरचा नाही. पण हळुहळु याची वाढ झाली तर रुग्णाला असाह्य त्रास होतो. या ट्युमरमुळे स्नायू घट्ट होतात. ज्यामुळे ऐकण्याचा त्रास सुरू होतो आणि कानाचं इंन्फेक्शनही होण्याची शक्यता असते.