मुंबई : आजकालच्या बदललेल्या आणि व्यस्त जीवनशैलीत आपला जास्तीत जास्त वेळ ऑफिसमध्ये जातो. त्यात कामाचा व्याप आणि टार्गेट्सचा ताण यामुळे टेन्शन येणे स्वाभाविकच आहे. पण हीच आपली जीवनशैली असल्याने त्यावर आपण काहीतरी मार्ग शोधणे गरजेचे आहे. ज्यामुळे आपण ताणविरहित, आनंदी जीवन जगू शकतो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कामाच्या ताणाचा परिणाम फक्त तुमच्या शरीरावर नाही तर मनावर देखील होतो. ताणामुळे मन अस्वस्थ होतं. राग, चिडचिड वाढते. आणि मग तोच राग आपण घरच्यांवर काढतो. तर काही वेळेस स्मोकिंगचा पर्याय निवडतो. कामाच्या या सततच्या ताणाकडे दुर्लक्ष केल्यास गंभीर समस्या उद्भवू शकतात.


पण हाच ताण आपण वेगळ्या पद्धतीने दूर केला तर..? त्यामुळे कोणालाच त्रास होणार नाही. व शरीर, मन देखील शांत होईल. यासाठी एक सोपा मार्ग. तो म्हणजे योगसाधना आणि त्यातील सहज सोप्या मुद्रा. या मुद्रा केल्याने ताण दूर होऊन तुम्ही आनंदी रहाल. 


योगा एक्स्पर्ट रमण मिश्रा यांनी सांगितलेली योगमुद्रा केल्याने कामाचा ताण वेळीच दूर होण्यास मदत होते व संपूर्ण शरीरात ऊर्जेचा संचार होतो. मुद्रेमुळे हातावरील काही ठराविक अ‍ॅक्यूप्रेशर पॉईंट्स दाबले जातात. त्यामुळे अवयवांना चालना मिळते आणि ताण निघून जातो. 


सेपना मुद्रा केल्याने सगळे नकारात्मक विचार दूर होवून ताण दूर होण्यास मदत होते. तसंच या मुद्रेमुळे नैराश्य, नकारात्मक ऊर्जा दूर होण्यास आणि शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकण्यास मदत होते. त्याचबरोबर कामावरची एकाग्रता वाढण्यास ही मुद्रा उपयुक्त ठरते. 



इतर हस्तमुद्रांप्रमाणे ही मुद्रा करणे देखील अत्यंत सोपे आहे.


सुखासनात बसा आणि हात एकत्र जोडा. हाताची ५ ही बोटं एकत्र राहतील असे पहा. जरूर वाचा: मेरूदंड मुद्रा करा आणि स्ट्रेस फ्री व्हा !
आता तर्जनी जोडलेली ठेऊन बाकीची बोटे एकमेकांमध्ये दुमडा.
आता तर्जनी जमिनीच्या दिशेला करा. या स्थितीत १५-२० सेकंद थांबा आणि श्वासावर लक्ष केंद्रीत करा. तुमचे हात रिलॅक्स राहतील असे पहा.
त्यानंतर हात मांड्यावर ठेवा. तळवे वरच्या दिशेने तोंड करून रिलॅक्स ठेवा.