मनाला प्रसन्न करतील ही ६ योगासने!
पाठीला स्ट्रेच देणारे काही व्यायामप्रकार केल्याने ताण हलका होऊन अगदी प्रसन्न वाटतं.
मुंबई : पाठीला स्ट्रेच देणारे काही व्यायामप्रकार केल्याने ताण हलका होऊन अगदी प्रसन्न वाटतं. पाठकण्याचे वरचे मणक्यांना स्ट्रेच देणारे व्यायामप्रकार केल्याने पाठीच्या वरच्या मणक्यांसोबत छाती, खांदे यावरील ताण हलका होऊन आनंदी आणि समाधानी वाटते. एखाद्या दिवशी डल, उदास वाटत असल्यास ही आसने नक्की करुन बघा काय फरक जाणवतो ते...
उष्ट्रासन (कॅमल पोज):
उष्ट्रासनामुळे पाठकणा, खांदे, छाती यांना सुरेखसा ताण मिळतो. यामुळे उत्साही व आनंदी वाटण्यास मदत होते.
परावृत्त बद्धपार्श्वकोणासन:
या आसनामुळे छातीचे स्नायू आडव्या कक्षेत रुंदावले जातात. तसेच यामुळे खांदे आणि मांडीच्या स्नायूंना देखील स्ट्रेच मिळतो.
पुर्वोत्तनासन:
खांद्याच्या स्नायूंना स्ट्रेच मिळतो. आणि पार्शवभागाचे स्नायूना बळकटी येते.
विपरीत वीरभद्रासन:
यामध्ये छातीच्या स्नायूंना सुंदरसा ताण मिळतो. तसंच संपूर्ण पाठकणा आणि मांड्यांची कार्यक्षमता वाढते.
मयूरासन (पीकॉक पोज):
छाती आणि खांद्यांच्या स्नायूंबरोबरच कंबरेचे स्नायू आणि हॅमस्ट्रिंग मसल्सला देखील स्ट्रेच मिळतो
अपवर्ड फेसिन्ग डॉग पोज:
अत्यंत सोपे आसन असून छातीचे स्नायू ताणले जातात. तसंच पाठकण्याची लवचिकता वाढण्यास मदत होते. आणि पार्श्वभागाला स्ट्रेच मिळतो.