मुंबई : पाठ दिसत नसल्यामुळे पाठीकडे दुर्लक्ष होत असेल. पण त्यामुळे पाठीवर चरबीचे थर वाढू लागतात. हे टायर्स दूर करण्यासाठी योगासनांची मदत होऊ शकेल. त्यामुळे पाठीवर वाढलेली चरबी दूर करण्यासाठी व मसल टोन सुधारण्यास ही आसने नियमित करा. 


शलभासन:


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हॅमस्ट्रिंग मसल्स स्ट्रेच होवून पाठीचे स्नायू टोन होतात. या आसनामुळे मेटॅबॉलिझम सुधारते व फॅट लवकर बर्न होण्यास मदत होते.


धनुरासन:


जर तुम्हाला बेसिक आसनं येत असतील आणि काही नवीन किंवा कठीण आसनं करण्याची इच्छा असेल तर हे आसन नक्की ट्राय करा. पाठ, पार्श्वभाग, मांड्याजवळील वजन कमी करण्यासाठी हे आसन उत्तम आहे.


अर्ध चंद्रासन:


हे आसन तुमच्या शरीराच्या वरच्या व खालच्या दोन्ही भागावर परिणाम घडवते. यात हातांचे स्नायू ताणले जातात व तुमचं बॅलन्सिंग सुधारतं.


सेतुबंधासन:


पाठकण्याचे आरोग्य सुधारण्यासाठी अतिशय उपयुक्त असे हे आसन आहे. यामुळे पोटाचे स्नायू टोन होतात. तसंच पाठकणा, पाय, हात यांची स्ट्रेंथ वाढते.


वसिष्ठासन:


हात, पाठ, पोट यावर परिणाम घडवून आणण्यासाठी हे आसन फायदेशीर आहे. एका बाजूला पाच श्वास थांबल्यानंतर हीच क्रिया दुसऱ्या बाजूने करा.


भुजंगासन:


पाठीवरचे फॅट्स बर्न करण्यासाठी आणि हात, पाय आणि पोटाचा भाग टोन करण्यासाठी हे आसन अतिशय प्रभावी आहे. पाठ व पार्श्वभागाजवळील स्नायू टोन करण्याबरोबर शरीराच्या दोन्ही बाजूला देखील त्याचा परिणाम दिसून येतो.