मुंबई : लसीकरण मोहीम ही कोरोनाव्हायरस विरूद्ध सर्वात प्रभावी उपाय मानली जातेय. सध्या देशात 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना कोरोना प्रतिबंधक लस दिली जातेय. लोकं लस घेतल्यानंतर होणाऱ्या दुष्परिणामांबाबत लोकांच्या मनात भीती आहे. तर दुसरीकडे लस घेतल्यानंतर हातामध्ये वेदना होत असल्याची तक्रार काही लोकांकडून करण्यात येतेय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चला तर आज जाणून घेऊया लस घेतलेल्या ठिकाणी दुख जाणवणं किती सामान्य आहे आणि हे असं का होतं. याचसोबत हे दुखणं कशा पद्धतीने दूर केलं जाऊ शकतं हे देखील पाहूयात.


तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, कोरोना लस मिळाल्यानंतर शरीराच्या रोगप्रतिकारक प्रतिसादामुळे हातांना वेदना होतात. लसीकरणानंतर होणारे कोणतेही दुष्परिणाम म्हणजे शरीराची प्रतिकारशक्ती सक्रिय असते.


डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, कोरोनाची लस इंट्रामस्क्युलर इंजेक्शनद्वारे दिली जाते. म्हणजेच ही लस थेट स्नायूंमध्ये देण्यात येते. अशा परिस्थितीत लसीच्या जागी सौम्य सूज येण्याची समस्या उद्भवते आणि यामुळे वेदना होते. काही लोकांना लसीच्या जागी वेदना होतात आणि काही लोकांना संपूर्ण हाताने वेदना जाणवते. याबद्दल घाबरून जाण्याची गरज नाही आणि ते सहजपणे बरं होतं.


लस मिळाल्यानंतर हातात वेदना होणं सामान्य आहे आणि त्याबद्दल काळजी करण्याची गरज नाही. लसीकरणानंतर होणाऱ्या इतर दुष्परिणामांप्रमाणेच हातातील वेदनाही दोन ते तीन दिवसांत बऱ्या होतात. काही लोकांमध्ये या वेदना 4-5 दिवस टिकू शकतात. परंतु त्यानंतर वेदना कायम राहिल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा.


वेदना कशी कमी करावी?


कोल्ड कॉम्प्रेसने वेदना कमी करण्याचा सल्ला दिला आहे. या व्यतिरिक्त, तज्ज्ञ हात एक्टिव्ह ठेवण्याचा सल्ला देतात. ज्यामुळे रक्ताभिसरण चालू राहतं आणि वेदना कमी होते. याशिवाय ताप झाल्यास पॅरासिटामॉल घेण्याचा सल्ला देण्यात येतो.


लस घेतल्यानंतर दुष्परिणाम का दिसतात?


लसीमध्ये व्हायरसचा निष्क्रिय केलेला भाग असतो. या भागाचा शरीरात प्रवेश होताच रोगप्रतिकारक शक्ती प्रतिसाद देते. रोगप्रतिकारक शक्ती शरीरास रोगजनक विषाणूंपासून वाचवण्याचा प्रयत्न करते आणि या कारणास्तव दुष्परिणाम दिसून येतात.