घरीच टेस्ट करा तुमचा फिटनेस, कोणते विकार तुम्हाला होवू शकतात
संशोधकांचे म्हणणे आहे की, जर हे चार व्यायामाचे प्रकार तुम्ही करू शकतात, तर तुम्ही निरोगी आहात
मुंबई : सर्वांना निरोगी रहायचे आहे. परंतू आपले आयुष्य किती आहे, हे कोणालाच माहित नाही. संशोधकांचे म्हणणे आहे की, जर हे चार व्यायामाचे प्रकार तुम्ही करू शकतात, तर तुम्ही निरोगी आहात.
जर तुम्ही एका पायावर वजन सांभाळून उभे राहू शकतात, तर तुमचा मेंदू निरोगी आहे. वेळ लावून बघा की तुम्ही ६० सेंकद असे करू शकतात. जर तुम्ही २० सेकंदानंतर दुसरा पाय टेकला, तर तुम्हाला मेंदुशी संबंधित विकार असू शकतात.
जपानमध्ये झालेल्या एका अभ्यासानुसार, ज्या प्रौढांना एका पायावर उभे राहण्यास त्रास होतो. त्यांना मायक्रोब्लीडला सामोरे जावे लागेल. मायक्रोब्लीड मेंदूशी संबंधित समस्या आहे.
एका अभ्यासानुसार, जर तुम्ही न थांबता चार वेळा जिना चढू शकतात, तर तुम्ही निरोगी राहाल. अभ्यासात समोर आले की निरोगी लोक ही टेस्ट न थांबता १ मिनिटात करतात. ज्या लोकांना हा टास्क पुर्ण करण्यात त्रास होतो, त्यांना हृदय समस्या आणि कर्करोग होण्याची शक्यता असते.
तुमच्या खुर्चीवर बसा आणि उठा. असे १० वेळा करा आणि बघा तुम्हाला किती वेळ लागतो. इंग्लंडमध्ये झालेल्या एका अभ्यासानुसार, जे पौढ २१ सेकंदात १० वेळा किंवा त्याहून कमी वेळात करतात ते निरोगी रहातात.
हे करण्यासाठी तुमच्या लोअर बॉडीचे मसल्स, स्ट्रेंथ, बॅलेंस, आणि कार्डिओ रेस्पिरेटरी फिटनेस चांगली असली पाहिजे.
खाली बसा, तुमच्या पायाला सरळ करा आणि पायाच्या अंगठ्याला हात लावायचा प्रयत्न करा. जर तुम्ही असे नाही करू शकलात तर तुम्हाला हृदयरोगासंबंधी समस्या होण्याची शक्यता असते.