मुंबई : अनेकदा पार्कमध्ये गेल्यावर डास फार त्रास देतात. मात्र तुमच्यासोबत असं कधी झालंय का की पार्कमध्ये तुमच्यासोबत असलेल्या व्यक्तीला डास चावत नाहीत मात्र तुमच्या शरीरावर डास चावल्याने भरपूर निशाण आले आहेत. असं का होतं यामागील कारण तुम्हाला माहित आहे का? का मच्छर काही खास लोकांना टारगेट करतात? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यामागे नेमकं काय कारण आहे आणि यापासून वाचण्यासाठी खास टीप्सही जाणून घेऊया


मेटाबॉलिक रेट 


तुमचा मेटाबॉलिक हा एक गुंतागुंतीचा विषय आहे. परंतु हे आपल्या शरीराने सोडलेल्या कार्बन डाय ऑक्साईवर आधारित असतं. कार्बन डाय ऑक्साईडचा वास गंध डासांना मानवाकडे आकर्षित करतो. मादी डास कार्बन डाय ऑक्साईडचा गंध त्याच्या 'सेंसिंग ऑर्गेन्स'द्वारे शोधते. एका अभ्यासानुसार, गर्भवती महिला सामान्य मानवांपेक्षा 20 टक्के जास्त कार्बन डाय ऑक्साईड सोडतात. यामुळेच डास त्यांना अधिक चावण्याची शक्यता असते.


स्किन बॅक्टेरिया 


तुम्हाला माहित आहे का की, तुमच्या त्वचेमध्ये अनेक प्रकारचे बॅक्टेरिया असतात. हे बॅक्टेरिया डासांना तुमच्या जवळ येण्यासाठी आमंत्रित करू शकतात. नुकत्याच झालेल्या एका अभ्यासात असा दावा करण्यात आला आहे की, डास हे काही खास प्रकारचे बॅक्टेरिया असलेल्या लोकांना अधिक असतात. 


रक्तगट


डास सामान्य रक्तगटापेक्षा 'ओ' रक्तगटाच्या लोकांकडे अधिक आकर्षित होतात. त्यानंतर 'अ' रक्तगटाच्या लोकांना डसण्याची अधिक शक्यता असते. 


हलक्या रंगाचे कपडे


डास बहुतेकदा मैदानाजवळ दिसतात. ते तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी गंध आणि दृष्टीचा वापर करतात. त्यामुळे शक्य असल्यास हलक्या रंगाचे कपडे घालून बाहेर जा. जेणेकरून डास चावण्याची शक्यता कमी होईल.


अंघोळ


डास आपल्या शरीराचा घाम आणि लॅक्टिक एसिड आकर्षित करतात. म्हणून, जेव्हाही तुम्ही व्यायामासाठी बाहेर जाता, घरी आल्यानंतर शक्य तितक्या लवकर आंघोळ करा. तसंच, वर्कआऊट सुरू करण्यापूर्वी आपल्या आजूबाजूला कीटकनाशकाचा वापर करा.


बियर पिऊ नका


एका अभ्यासानुसार, बिअर पिणाऱ्या लोकांचं रक्त डासांनाही आवडतं. त्यामुळे एकतर बियर पिणं टाळा किंवा पार्टीमध्ये पंखे सुरु ठेवा. जोरदार वाऱ्यात डास उडू शकत नाहीत.