मुंबई : गर्भारपणात महिलांना आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते. गर्भधारणेपूर्वी आणि गर्भारपणात केमिकल्सयुक्त प्रॉडक्ट्सचा वापर केल्याने प्रजननशक्तीवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे महिलांच्या आवडत्या मेकअप आणि ब्युटी प्रॉडक्ट्सपासून सावध राहणे गरजेचे आहे. म्हणूनच गर्भारपणात या कॉस्मेटिक्सचा वापर करणे टाळावे. 


पिंपल क्रिम


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पिंपल्स किंवा त्वचेसंबंधित इतर समस्यांसाठी कोणतीही क्रिम वा लोशन लावण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या. 


हेअर डाय


हेअर डायमध्ये अमोनिया असते. ज्यामुळे त्वचा आणि फुफ्फुसांचे नुकसान होते. त्यामुळे गर्भधारणेपूर्वी किंवा गर्भारपणात याचा वापर टाळणेच योग्य ठरेल.


नेलपॉलिश


नेलपॉलिश विकत घेण्यापूर्वी त्यावरील माहिती नीट वाचा. मिथाईलबेंजेन किंवा टॉल्यूएन यांसारखे घटक असलेली नेलपॉलिश प्रेग्नेंसीदरम्यान वापरणे सुरक्षित नाही. कारण हे घटक कॅन्सरला कारणीभूत ठरु शकतात.


हेअर रिमूव्हल क्रिम


या क्रिममध्ये थायग्लाईकोलिक अॅसिड असते. विविध अभ्यासातून हे दिसून आले आहे की, याचा पोटात वाढणाऱ्या गर्भाला नुकसान पोहचते.