सीपीआर (CPR) पद्धत काय आहे: 


How To Do CPR: हल्ली सगळ्याच गोष्टी फास्ट असल्यामुळे आपण आपल्या संतुलित आहाराकडे दुर्लक्ष करत असतो. मग बऱ्याचवेळेस लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यातलीच एक प्रमुख समस्या ती म्हणजे हार्ट अटॅक (Heart Attach). सध्या हार्ट अटॅक येणे खूप सामान्य झाले आहे. कोणत्याही वयात हार्ट अटॅक येऊ शकतो. अगदी हसताना देखील लोकांना हार्ट अटॅक येतो. (You too can save a life if you have a heart attack just do these two things nz)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुम्हाला माहितेय का? कोणा व्यक्तीला हार्ट अटॅक आल्यास आणि तुम्ही त्या घटना स्थळी असल्यास तुम्हाला सीपीआर कसा द्यायचा हे माहित असेल तर तुम्ही त्या व्यक्तीचा जीव वाचवू शकता.


CPR चे पूर्ण रूप कार्डिओपल्मोनरी रिसुसिटेशन आहे. या प्रक्रियेने तुम्ही हार्ट अटॅक आलेल्या व्यक्तीचा जीव वाचवू शकता. CPR देण्यासाठी डॉक्टरांची गरज नाही, तुम्ही स्वतः देऊ शकता. होय, यासाठी तुम्हाला योग्य तंत्र माहित असणे आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला सीपीआर कसा द्यावा याविषयी सांगणार आहोत- 


आणखी वाचा - Hair Care Tips : डोक्यावरील पिंपल्सचा कसा करा उपाय, मिळेल मोठा रिलीफ..


सीपीआर कसा दिला जातो?


1 सगळ्यात आधी, दोन्ही हात एकमेकांच्या वर ठेवून, बोटे एकमेकांना अडकवा. तुम्हाला तुमचे हात चांगले लॉक करावे लागतील.
2 आता तुम्हाला हार्ट अटॅक आलेल्या व्यक्तीच्या छातीच्या मध्यभागी कॉम्प्रेशन द्यायला सुरू करावे.
3 तुम्हाला जलद कॉम्प्रेशन सुरू करावे लागेल. तुम्हाला हे 30 वेळा करावे लागेल आणि त्यानंतर तुम्हाला त्या व्यक्तीच्या तोंडातून श्वास घ्यावा लागेल.
4 तोंडाने श्वास देण्याची पद्धत अशी आहे की तुम्ही त्या व्यक्तीचे नाक धरून डोके थोडे मागे वळवा, ज्यामुळे श्वस घेण्याचा मार्ग उघडेल आणि जबडा खाली खेचा. आता तोंडातून 2 वेळा श्वास द्या आणि पुन्हा छातीवर दाब द्या.
5 तुम्हाला 1 मिनिटात 100 ते 120 वेळा छाती जोरात दाबावी लागेल. 
6 जोपर्यंत ती व्यक्ती श्वास घेऊ शकत नाही तोपर्यंत तुम्हाला हे 30 वेळा छातीवर दाब द्यावा लागेल आणि 2 वेळा तोंडातून श्वास द्यावा लागेल. ॲमब्यूलेन्स येईपर्यंत किंवा हॉस्पीटलमध्ये पोहोचेपर्यंत त्या व्यक्तीला हे करत राहा.
7 या वेगाने पंप केल्याने हृदयाला रक्तपुरवठा वाढतो आणि हार्ट अटॅक आलेल्या व्यक्तीचे प्राण वाचू शकतात.
8 सीपीआर देण्याबरोबरच त्या व्यक्तीला ताबडतोब डॉक्टरांकडे नेण्यास किंवा ॲमब्यूलेन्स बोलवण्यास विसरू नका. 


आणखी वाचा - Swelling in Eyelids Causes: तुमच्या ही पापण्या सुजतात का? जाणून घ्या कारणे आणि घरगुती उपाय...


(Disclaimer: वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. दैनंदिन आयुष्यात याचा वापर करायचा झाल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)