मुंबई :  असे म्हणतात की, निरोगी शरीरात निरोगी मन आणि निरोगी मेंदू राहतो. म्हणूनच फक्त पौष्टिक जेवण आणि व्यवस्थित दिनचर्याचं फक्त गरजेची नाही. तर, नियमित व्यायाम करणे गरजेचे आहे. एका अभ्यासानुसार रोज थोडा थोडा व्यायाम केल्याने आपला मेंदू चांगला राहतो. म्हणजेच तुमच्या मेंदूच्या कार्यप्रणालीत मोठी सुधारणा होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संशोधकांच्या एका टीमने हा अभ्यास उंदरांवर केला आणि बघितले की, रोज थोडासा व्यायाम केल्याने म्हणजेच मध्ये-मध्ये व्यायाम केल्याने जिन्स अॅक्टिव्ह होतात. जे मेंदूच्या हिप्पोकॅम्पस नावाच्या भागात असलेल्या न्युरॉन्समध्ये असलेल्या कनेक्शनला अजून मजबूत करतात. मेंदूचा हा भाग स्मरणशक्ती आणि शिकण्याच्या संबंधित महत्वाचा आहे.


आता तुम्हाला असं वाटेल, उंदरांकडून व्यायाम कसा करून घेतला. तर अभ्यासात असलेल्या उंदराना २ तासांसाठी एका रनिंग व्हीलवर ठेवले आणि त्या दरम्यान त्यांच्या मेंदूच्या कार्यप्रणालीला मोजण्यात आले. eLife मध्ये प्रकाशित अभ्यासात रोज थोडा थोडा व्यायाम केल्याणे मेंदूत हिप्पोकॅम्पस भागात सिनेप्सेसची वाढ होते.  


याआधी प्राण्यांवर आणि माणसांवर झालेल्या अभ्यासात समोर आले आहे की, नेहमी व्यायाम केल्याने मेंदूत सकारात्मक बदल होतात.