मुंबई : बेली फॅट कमी करण्याच्या टिप्स जाणून घेण्यापूर्वी हे फॅट वाढण्याची कारणं जाणून घेतली पाहिजे. पोटाची चरबी वाढवणाऱ्या या सवयी जर तुम्ही दूर केल्या नाहीत, तर तुम्ही कितीही वजन कमी करण्यासाठी आटापिटा केला तरी त्याचा काहीही फायदा होणार नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुमच्या दैनंदिन जीवनातील या वैयक्तिक सवयी तुमच्या पोटाची चरबी वाढवतात. बेली फॅट कमी करण्यासाठी कोणत्या वैयक्तिक सवयी टाळल्या पाहिजेत ते जाणून घेऊया.


सतत खाणं


जेंव्हा तुम्ही काहीही खाता त्यावेळी ते शरीराला ते पचायला वेळ लागतो. मात्र काही लोकं कमी वेळेत जास्त वेळा खातात. त्यामुळे पचनसंस्थेला फॅटचा योग्य वापर करता येत नाही. हे फॅट शरीरावर जमा होऊ लागतं. परिणामी बेली फॅट वाढतं. 


रात्री-अपरात्री खाणं


बेली फॅट कमी करण्यासाठी रात्रीचं जेवण हे झोपण्याच्या किमान 2 तास आधी घ्यावं. कारण रात्री उशिरा किंवा झोपण्यापूर्वी अन्न खाल्ल्यानंतर अन्नाचं पचन योग्य पद्धतीने होत नाही. हे चरबी बनून शरीरावर जमा होऊ लागतं. त्यामुळे तुमचे वजन वाढू लागतं.


कमी झोप घेणं


ज्या लोकांना इन्सोमेनियाचा त्रास असतो किंवा पुरेशी झोप मिळत नाही, अशा व्यक्तींची पचनक्रिया मंदावते. त्यामुळे शरीरातील फॅटचा ऊर्जेप्रमाणे उपयोग होत नाही. अशा परिस्थितीत पोटाची चरबी वाढू लागते. त्यामुळे पुरेशी झोप घेणं ही पोटाची चरबी कमी करण्याचा प्रभावी उपाय आहे.